मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /चित्रपटाला सुद्धा लाजवेल, या दोन भामट्यांनी तब्बल 250 तरुणींना फसवलं; पद्धत पाहून पोलीस हैराण

चित्रपटाला सुद्धा लाजवेल, या दोन भामट्यांनी तब्बल 250 तरुणींना फसवलं; पद्धत पाहून पोलीस हैराण

या दोन भामट्यांनी पुण्यात- 91, बंगळुरूमध्ये 142 आणि दिल्लीतील गुरगाव येथील 22 मुलींची आर्थिक फसवणूक आणि फसवलेल्या मुलींपैकी अनेकींचं शारीरिक शोषण

या दोन भामट्यांनी पुण्यात- 91, बंगळुरूमध्ये 142 आणि दिल्लीतील गुरगाव येथील 22 मुलींची आर्थिक फसवणूक आणि फसवलेल्या मुलींपैकी अनेकींचं शारीरिक शोषण

या दोन भामट्यांनी पुण्यात- 91, बंगळुरूमध्ये 142 आणि दिल्लीतील गुरगाव येथील 22 मुलींची आर्थिक फसवणूक आणि फसवलेल्या मुलींपैकी अनेकींचं शारीरिक शोषण

पिंपरी चिंचवड, 26 जानेवारी : केंद्रासरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचं सांगून मॅट्रिमोनियल साईटवरून (Matrimonial site) तब्बल 250 मुलींना फसवणाऱ्या (250 girls cheated) दोन अट्टल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड (pimpari chinchvad police) पोलिसांनी अटक केली आहे. या दोन भामट्यांनी पुण्यात- 91, बंगळुरूमध्ये 142 आणि दिल्लीतील गुरगाव येथील 22 मुलींची आर्थिक फसवणूक आणि फसवलेल्या मुलींपैकी अनेकींचं शारीरिक शोषण केल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.

या प्रकरणाबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash) यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना (Rameshchand Nandwana) आणि विशाल हर्षद शर्मा (Vishal Harshad Sharma) असं अटक केलेल्या आरोपींच नाव आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनीषा धारणे नामक एक सामाजिक कार्यकर्ता तरुणी तीन पीडित तरुणींनी घेऊन त्यांच्याकडे आली आणि तिघींनाही एकाच व्यक्तीने फसविल्याची तक्रार केली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आणि मुगळीकर यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या राज्यात जाऊन आरोपी विरुद्ध पुरावे गोळा केले आणि त्यांना रंगेहात जेरबंद करत त्यांच्याकडून 50 हुन अधिक बनावट ओळखपत्र,अनेक मोबाईल आणि तब्बल 75 लाखांची रोकड जप्त केली हे दोघेही आरोपी एकमेकांचे मित्र होते मात्र त्यांनी कधीही आपली मैत्री उघड केली नाही.

(शाळेत मुलांमध्ये वाटले सॅनिटरी पॅड; 3 वर्षांपासून पैसेही जातायेत अकाऊंटमध्ये)

दोघेही जीवनसाथी मॅट्रोमॉनियल साईटवर स्वतःला केंद्र सरकारचे बडे अधिकारी असल्याचे सांगायचे. या दोघांनी बनावट खाते तयार केली होती. ज्या मुलीने भेटण्यासाठी संमती दिली तिला भेटायला जातांना आलिशान गाड्यामधून जायचे, मग त्यांना लग्नाचं आमिष दाखवून  विश्वास संपादन करायचा. त्यानंतर हॉटेलवर घेऊन जायचे. मात्र त्या नंतरचा सर्व खर्च दोन्ही आरोपी मुलींनाच करायला लावायचे. जेणेकरून पकडलो गेलो तर मुलींनीच आपल्याला हॉटेलवर आणलं आणि फसवलं असा बनाव करायचा अशी दोघांची योजना होती. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास केला आणि दोघांचीही योजना हाणून पाडाली.

एचआर महिलेकडून उकळले 13 लाख!

अनेक वेळा या दोघांनी काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला नोकरीतून निलंबित केले आहे आणि परत नोकरीत घेण्यासाठी पैसे लागणार असं खोटं सांगून फसवलेल्या मुलींकडून लाखो रुपये उकळले होते. तर एका प्रकरणात मोठ्या प्रोजेक्टसाठी 60 लाख रुपये लागणार असल्याचं सांगून आरोपी निशांत ने एका आयटी कंपनीतील एचआर असलेल्या महिलेकडून तब्बल 13 लाख रुपये उकळले आणि तिचं शारीरिक शोषणही केलं.

अनेक तरुणींनी तक्रार केलीच नाही!

आरोपी निशांत आणि विशालची बोलण्याची पद्धत बघून अनेक मुलींना आरोपी फार शिक्षित नसल्याचा शंका यायची. मात्र तोपर्यंत खूप वेळ झालेला असायचा कारण फसल्या गेलेल्या मुली पैशासोबत आपली अब्रूही या नराधमाच्या स्वाधीन करून बसायच्या, अशा वेळी पोलिसांकडे जावं तर चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे लागेल आणि समाजात आपली बदनामी होऊन लग्नाला अडचणी येतील या भीतीने पीडित मुली समोर यायच्या नाही, मात्र काही मुली धाडसाने समोर आल्या आणि या दोघांच पितळ उघडं पडलं.

VIDEO: राष्ट्रवादी काँग्रेसमधील इनकमिंग संदर्भात जयंत पाटील यांनी दिली मोठी अपडेट

विकृत मानसिकतेतून शारीरिक आणि आर्थिक फसवणूक करत बनावट ओळखीच्या आधारे तब्बल अडीचशेहुन अधिक मुलींना सावज बनविणारे हे दोघे गजाआड आहेत. ही देशातील पहिलीच घटना असेल जी पीडित महिला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली अन्यथा आणखी शेकडो मुली या दोघांच्या विकृतीला बळी पडल्या असत्या.  हा प्रकार आणखी कुणा सोबत घडू नये यासाठी लग्न जुळविणाऱ्या कुठल्याही online साईटवर आपली ओळख देतांना समोरच्या व्यक्तीबद्दल पूर्ण आणि खात्रीशीर माहिती असेल तरच पुढे बोला, असं आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे. या कागिरीसाठी सखोल आणि धाडसी तपास केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाला साठ हजारांचं परितोषिक घोषित केलं आहे.

First published:

Tags: Pimpari chinchawad, Pune (City/Town/Village)