मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /VIDEO : पोलिसांच्या समोरच दोन तरुणींची दबंगगिरी, तरुणाला धो-धो धुतले

VIDEO : पोलिसांच्या समोरच दोन तरुणींची दबंगगिरी, तरुणाला धो-धो धुतले

ही घटना गाझियाबादच्या मधुबन बापुधाम भागातील सेक्टर 23 चौकातील आहे. याठिकाणी स्कूटीच्या धडकेवरुन झालेल्या वादात दोन मुलींनी एका मुलाला बेदम मारहाण केली.

ही घटना गाझियाबादच्या मधुबन बापुधाम भागातील सेक्टर 23 चौकातील आहे. याठिकाणी स्कूटीच्या धडकेवरुन झालेल्या वादात दोन मुलींनी एका मुलाला बेदम मारहाण केली.

ही घटना गाझियाबादच्या मधुबन बापुधाम भागातील सेक्टर 23 चौकातील आहे. याठिकाणी स्कूटीच्या धडकेवरुन झालेल्या वादात दोन मुलींनी एका मुलाला बेदम मारहाण केली.

गाजियाबाद, 12 जुलै : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad UP News) मुलींनी रस्त्यावरच एकाला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गाझियाबाद जिल्ह्यात दोन मुलींनी साथीदारांच्या मदतीने एका तरुणाला थेट बेदम मारहाण केली. (Young Girls Beaten Young Boy) तरुणी या तरुणाला मारहाण करत असताना पोलीस घटनास्थळी उपस्थित होते आणि प्रेक्षक म्हणून हा सर्व प्रकार पाहत होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण - 

ही घटना गाझियाबादच्या मधुबन बापुधाम भागातील सेक्टर 23 चौकातील आहे. याठिकाणी स्कूटीच्या धडकेवरुन झालेल्या वादात दोन मुलींनी एका मुलाला बेदम मारहाण केली. तरुणींनी या तरुणाला हेल्मेट आणि विटांनी खूप मारहाण केली आणि तिथे उपस्थित लोक हा तमाशा बघतच राहिले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसमोरच मुलींनी त्याच्या थोबाडीत मारली. पोलिसांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलींनी तरुणावर मारहाण सुरुच ठेवली.

https://youtu.be/9gtNgKsLeJ0

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीडित तरुण मुलींना मारहाण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, या मुली त्याचा हात बाजूला करुन त्याच्या कानशिलात मारत आहेत. पोलिसांच्या मध्यस्थीनंतरही तरुणी वारंवार हात सोडवून तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, पोलिसांनी सक्ती केल्यानंतर मुली तिथून पळून गेल्या.

हेही वाचा - 'माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी टाईमपास केला'; प्रियकराचं बोलणं ऐकताच तरुणीने उचललं भयानक पाऊल 

दरम्यान, पोलिसांनी या तरुणींना अटक केलेली नाही. व्हिडिओच्या आधारावर त्यांचा शोध घेतला जात आहे. ही घटना सोमवार रात्रीची आहे. यावेळी तरुणी एक स्कुटीवर जात होत्या. तेव्हा त्यांची स्कुटी ही दुसऱ्या स्कुटीवर धडकली, जिला एक तरुण चालवत होता. मात्र, यानंतर त्यांच्यात वाद झाला. याचे रुपांतर हाणामारीत झाले आणि या तरुणींनी त्या तरुणाची मारहाण केली.

First published:

Tags: Crime news, Police, Up crime news