मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी टाईमपास केला'; प्रियकराचं बोलणं ऐकताच तरुणीने उचललं भयानक पाऊल

'माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी टाईमपास केला'; प्रियकराचं बोलणं ऐकताच तरुणीने उचललं भयानक पाऊल

तपासात अनेक नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. यात आरोपी विशाल आणि आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय तरुणीचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते.

तपासात अनेक नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. यात आरोपी विशाल आणि आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय तरुणीचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते.

तपासात अनेक नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. यात आरोपी विशाल आणि आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय तरुणीचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते.

  • Published by:  News18 Desk
अमरावती, 11 जुलै : एकमेकांच्या प्रेमात (Love) पडल्यावर सात जन्म सोबत राहणाच्या शपथा घेणारे प्रेमी युगुल (Couple) तुम्ही पाहिली असेल. प्रेमाला नकार दिल्यावर आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत असतात. मात्र, अमरावती जिल्ह्यातून एक प्रेम प्रकरणाशी (Love Affair) संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला मी तुझ्यासोबत टाईमपास केला, हे सांगितल्यावर प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. (Boyfriend Rejects Girlfriend) काय आहे संपूर्ण प्रकरण - मी तुझ्यावर प्रेम वगैरे काही केलेले नाही. तर फक्त टाईमपास केला, असे एका प्रियकराने प्रेयसीला सांगितले आणि लग्नाला नकार दिला. यानंतर एका 19 वर्षाय प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 28 मेला संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी 8 जुलैला अमरावती येथील विशाल नावाच्या तरुणाविरोधात वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तरुणाविरोधात कलम 306 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप आरापोला अटक करण्यात आलेली नाही. 28 तारखेला एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यानंतर वलगाव पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती. यानंतर या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. तपासात अनेक नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. यात आरोपी विशाल आणि आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय तरुणीचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. तसेच दोघांमध्ये प्रेम इतके पुढे गेले की, या तरुणाने तिला लग्नाचे आमिषही दिले होते. यामुळे ही तरुणी त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. मात्र, काही महिन्यांपासून तो तिला टाळू लागला होता. तसेच त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, मी तुझ्यासोबत फक्त टाईमपास केला. मला आता दुसरी मुलगी मिळाली आहे. तुझे नातेवाईक माझ्या नातेवाईकांशी का बोलले, त्याचा मी वचपा घेतला आहे, असे म्हणत त्याने लग्नाला नकार दिला. हा सर्व प्रकार तिच्यासोबत घडल्यानंतर तिला धक्काच बसला. तिला हे प्रेमभंगाचे दु:ख तिला पचवता आले नाही, त्यामुळे अखेर तिने धक्कादायक निर्णय घेतला. तिने 28 तारखेला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हेही वाचा - वहिनीच्या प्रेमात बेधुंद दीर, 21 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीसोबत केलं भयानक कृत्य यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत आरोपी बद्दल तक्रार केली होती. तिच्या आत्महत्येला तोच कारणीभूत असा जबाब त्यांनी दिला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात वलगाव पोलीस ठाणेदारांकडे चौकशी अहवाल देण्यात आला. यानंतर आरोपी विशालविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय गिते हे करीत आहेत.
First published:

Tags: Amravati, Boyfriend, Crime news, Girlfriend

पुढील बातम्या