मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : गुपचूप आले, सावध झाले, संधी मिळताच बाळाला उचलून पळाले, कल्याण रेल्वे स्थानकावर बाळाची चोरी

VIDEO : गुपचूप आले, सावध झाले, संधी मिळताच बाळाला उचलून पळाले, कल्याण रेल्वे स्थानकावर बाळाची चोरी

  • Published by:  Chetan Patil
कल्याण, 18 ऑगस्ट : कल्याण रेल्वे स्थानकावर अडीच वर्षाचा बाळाची चोरी करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी रेल्वे स्थानकावर फलाटावर झोपलेल्या लहान मुलाला उचलून पळवून नेलं होतं. बाळाची आई वडापाव घेण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गेली असताना संबंधित घटना घडली होती. ही महिला बिहार राज्यातून रोजगाराच्या शोधासाठी आली होती. संबंधित घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाली होती. याच सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय संजू देवी राजवंश ही महिला रोजगाराच्या शोधासाठी आपल्या अडीच वर्षाच्या मुलासह कल्याणमध्ये दाखल झाली होती. ही महिला तीन दिवसांपूर्वी बिहारहून रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने कल्याणमध्ये आली होती. महिला आज पहाटे वडापाव घेण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर गेली होती. यावेळी ती आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपवून गेली होती. आई आपल्या मुलाजवळ नाही याच गोष्टीचा फायदा घेवून आरोपींनी संधी साधली. आरोपी अमित आपली सहकारी पूजासह तिथे आला. दोघांनी मुलगा आणि त्याच्या आजूबाजूला झोपलेले गाढ झोपले आहेत ना? याची शाहानिशा केली. त्यांनंतर जलद वेगाने बाळाला उचललं आणि तिथून धूम ठोकली. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलाची चोरी झाल्यानंतर महिला तिथे घटनास्थळी प्लॅटफॉर्मवर आली. तिने तिथे आपला मुलगा नाही हे पाहिलं आणि तिला धक्काच बसला. ती आपल्या बाळाला शोधू लागली. तिने प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांना आपल्या मुलाबद्दल विचारपूस केली. पण तिला पुरेशी माहिती मिळाली नाही. याशिवाय तिने मुलाला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण मुलाचा शोध लागला नाही. त्यामुळे ती घाबरली. आपलं बाळ मिळत नसल्याने ती हवालदिल झाली आणि रडू लागली. अखेर तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. (यवतमाळमध्ये शिक्षिकेवर तरुणाचा हल्ला, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?) पोलिसांनी संबंधित घटनेची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी फलाटावर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष आणि महिला अडीच वर्षाच्या मुलाला चोरुन घेवून जात असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे पोलिसांचं अर्ध काम सोपं झालं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी आरोपींना उल्हासनगर येथून अटक केली. तसेच आरोपींकडून अपहरण केलेल्या अडीच वर्षाच्या मुलाला देखील ताब्यात घेतलं.
First published:

Tags: Baby kidnap, Crime, Kalyan, Kidnapping

पुढील बातम्या