जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेयसीचे हट्ट पुरवण्याच्या नादात बनला चोर; तब्बल 27 दुचाकी चोरणाऱ्या प्रियकराला अटक

प्रेयसीचे हट्ट पुरवण्याच्या नादात बनला चोर; तब्बल 27 दुचाकी चोरणाऱ्या प्रियकराला अटक

प्रेयसीचे हट्ट पुरवण्याच्या नादात बनला चोर; तब्बल 27 दुचाकी चोरणाऱ्या प्रियकराला अटक

प्रेयसीचे हट्ट पुरवण्याच्या नादात बनला चोर; तब्बल 27 दुचाकी चोरणाऱ्या प्रियकराला अटक

Bike thief arrested by Police : झारखंडमधील खुंटी येथे प्रेयसीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहताना खर्च वाढला. हा खर्च भागवण्यासाठी प्रियकर दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. आरोपी दुचाकी चोरून जंगलात लपवून ठेवायचे आणि नंतर परराज्यातील ग्राहकांना विकायचा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जून : प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असं म्हणतात. आपल्या प्रेमासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. आता हेच बघा ना, आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे लाड पुरवण्याच्या नादात एक बहाद्दर चक्क दुचाकी चोर (Bike thief) बनला. त्याने एक नाही, दोन नाही, तब्बल 27 दुचाकी चोरल्या. या प्रेमवीराला पोलिसांनी (thief arrested by Police) अटक केली असून त्याचे कारनामे ऐकून पोलिसही (Police) चक्रावले. संबंधित आरोपी झारखंडमधील खुंटी येथे प्रेयसीसोबत (Girlfried) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत होता. परंतु खर्च वाढला, तेव्हा प्रियकराने चक्क दुचाकी चोरायला सुरुवात केली. दुचाकी चोरीलाच त्यानं आपला धंदा बनवून टाकलं. नंतर या तरुणाला दुचाकी चोरीची सवयच लागली. त्यानं असंख्य दुचाकी आणि स्कूटी चोरल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. हा युवक चोरलेल्या दुचाकी आणि स्कूटीची नंबर प्लेट बदलून घनदाट जंगलात लपवून ठेवत असे. स्थानिक पातळीवर चोरीच्या दुचाकीची किंमत कमी असल्याने तो बाहेरील ग्राहकांपर्यंत पोहोचवत असे. खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी या दुचाकी चोरणाऱ्या टोळीची माहिती दिली. हेही वाचा:  Shocking! शारीरिक संबंधादरम्यान डोळ्यांवर बांधायचा पट्टी; लग्नानंतर 10 महिन्यांनी पती स्त्री असल्याचं समजलं या प्रकरणी पोलिसांनी तीन दुचाकी चोरांना एकूण 27 चोरीच्या दुचाकी आणि स्कूटींसह अटक केली असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. खुंटी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी आणि स्कूटी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होतं. खुंटीचे एसपी अमन कुमार यांच्या सूचनेवरून चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकाने वेगवेगळ्या माध्यमातून माहिती गोळा केली. त्यानंतर काही संशयित व्यक्ती चोरीची दुचाकी लपवण्यासाठी रेमटा मार्गे दशमील मार्गे कुठेतरी नेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून तत्परतेने कारवाई करत पथकाने चुकरू वळणावर सापळा रचला आणि दुचाकी चोरांची वाट पाहण्यास सुरुवात केली. चोरीच्या दुचाकी घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पोलिस दिसताच ते दुचाकीसह पळू लागले, मात्र चुकरू वळणावर स्पीड ब्रेकर असल्याने पोलिसांनी त्यांना पकडले. दुचाकीची कागदपत्रे मागितल्यावर हे लोक कागदपत्रे दाखवू शकले नाहीत आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, या सर्व आरोपींनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग कबूल केला असून हे लोक चोरीच्या दुचाकी जंगलातील झुडपात लपवण्यासाठी जात असल्याचे सांगितले. हेही वाचा:  अहमदनगर हादरलं! पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपींच्या सांगण्यावरून खुंटी आर्की व मरांघाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणांहून 9 TVS अपाचे, 13 स्कूटी, 2 होंडा CBR, 1 होंडा शाइन, 1 यामाहा एमटी आणि एका पल्सरसह 27 दुचाकी जप्त करण्यात आल्या. मनोज स्वांसी, हरेकृष्ण लोहरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, एक आरोपी अल्पवयीन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात