अहमदनगर, 19 जून : अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला आहे. आरोपी अत्याचार करुन थांबला नाही तर त्याने पीडितेला जीवे मारण्याचादेखील प्रयत्न केला. सुदैवाने चिमुकलीची आई घटनास्थळी धावत आल्याने पीडितेचा जीव वाचला. संबंधित घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर अशाप्रकारचं किळसवाणं आणि संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. राहुरी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आरोपी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(भररस्त्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; गावात उडाली खळबळ)
पीडितेच्या आईने संबंधित घटनेविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "मुलगी घरात नसल्याने आम्ही तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडलो. तिला गावात सर्वत्र शोधलं. पण तिचा तपास लागला नाही. तिच्या एका मैत्रिणीने ती एका व्यक्तीसोबत शेताच्या दिशेला गेल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही शेताकडे गेलो. यावेळी एक नराधन मुलीचा गळा आवळताना दिसला. तो कपड्याने मुलीचा गळा दाबत होता. मुलीची अवस्था बघून मी घाबरली. मी नराधमाची गच्ची पकडली. त्यानंतर मुलीच्या वडिलांना हाक मारली. ते येईपर्यंत नराधम पळून गेला होता", अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime, Rape, Rape accussed, Rape case, Rape on minor