चंदिगढ, 27 सप्टेंबर : अत्यंत भीषण अपघात होऊनही दोघांना काहीही न झाल्याची (Two teachers survived without a single wound from terrific accident) आश्चर्यकारक घटना नुकतीच समोर आली आहे. रोजच्याप्रमाणं शाळेत चाललेल्या शिक्षकांच्या कारला मागून दुसऱ्या (Car dashed another car) कारनं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील चौघे गंभीर (Four injured) जखमी झाले. मात्र नुकत्याच कारमध्ये बसलेल्या दोन शिक्षकांना साधं खरचटलंदेखील नाही. सध्या या अपघाताची जोरदार चर्चा सुरु आहे.
असा झाला अपघात
हरियाणातील जिंद जिल्ह्यात काही शिक्षक एका कारमध्ये बसून शाळेत चालले होते. त्यापूर्वी काही शिक्षकांच्या बॅगा गाडीच्या डिकीत ठेवण्याचं काम सुरू होतं. दोन शिक्षक गाडीत बॅग ठेवत होते. तेवढ्यात पाठिमागून वाऱ्याच्या वेगानं आलेल्या कारनं शिक्षकांच्या कारला जोरदार टक्कर मारली. ही धडक इतकी भीषण आणि जोरदार होती की शिक्षकांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील 4 शिक्षकांपैकी दोघांना एवढ्या भीषण अपघातात काहीही झालं नाही. ते अगदी सहीसलामत या अपघातातून बचावले. इतर दोन शिक्षकांसह एकूण पाच जण या अपघातात जखमी झाले.
हे वाचा -प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय
सीसीटीव्हीतून झाला उलगडा
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर अपघाताचं गांभीर्य सर्वांनाच समजलं. एका बस थांब्यापाशी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. त्यात गाडीत बसलेले शिक्षक, गाडीच्या डिकीत सामान ठेवणारे शिक्षक आणि पाठिमागून जोरदार टक्कर देणारी कार हे दृश्य दिसतं. यावरून हा अपघात किती भीषण असेल, याची कल्पना येऊ शकते. अपघातानंतर कारची झालेली अवस्था पाहून तर इतक्या भयंकर अपघातातून काहीही न होता कोण कसं वाचू शकतं, असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा एक चमत्कारच मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.