जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय

प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय

प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय

आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची (Boyfriend and Girlfriend hanged themselves as couldn’t marry each other) शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र फाशी घेतल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 27 सप्टेंबर : आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची (Boyfriend and Girlfriend hanged themselves as couldn’t marry each other) शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र फाशी घेतल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकमेकांच्या साथीनं एकाच ओढणीने कंबर बांधून झाडाला (Commit Suicide) लटकून जीव दिला. एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रियकराचे झाले होते लग्न राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये राहणाऱ्या प्रवीण आणि रिना या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र त्यातील प्रियकराचं घरच्यांनी लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणात मोठा अडथळा निर्माण झाला होता. दोघांना एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असताना प्रियकराच्या पत्नीचं काय करायचं, हा विचार दोघांनाही अस्वस्थ करत होता. एकमेकांशी लग्न होण्याची कुठलीही शक्यता दृष्टीपथात नसल्यामुळे दोघंही वैफल्यग्रस्त झाले होते. अखेर एकत्र फाशी घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रस्त्यात घेतली फाशी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या रस्त्यावरील झाडाला लटकून फाशी घेण्याचं त्यांनी निश्चित केलं. त्यासाठी त्यांनी दोन साड्या आणि एका ओढणीचा उपयोग केला. दोघांनी ओढणी आपल्या कंबरेभोवती गुंडाळली आणि साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांना अचानक झाडावर लटकणारे दोन मृतदेह दिसल्यानंतर धक्का बसला. हे वाचा - रात्री मित्रासह पत्नीच्या खोलीत शिरला अन्…; 22वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस पोलीस तपास सुरू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह खाली उतरवले आणि घरच्यांना याची कल्पना दिली. मुलीचे वडील बाहेरगावी असल्याने ते आल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. दोघांचं अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पहिल्या लग्नामुळे विवाह करण्यात येणारा अडथळा हेच आत्महत्येमागचं कारण सध्या समोर येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात