मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलीसाठी वाद, दोस्तीत कुस्ती, मित्राच्या वडिलांचा भर दिवसा खून, बारामतीत घडलेल्या हत्येचं गूढ अखेर उकललं

मुलीसाठी वाद, दोस्तीत कुस्ती, मित्राच्या वडिलांचा भर दिवसा खून, बारामतीत घडलेल्या हत्येचं गूढ अखेर उकललं

मृतक व्यक्तीचा फोटो

मृतक व्यक्तीचा फोटो

बारामतीत गुरुवारी मुलीला शाळेत घ्यायला वडिलाची अल्पवीयन मुलांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

पुणे, 19 ऑगस्ट : बारामती शहरातील श्रीरामनगर येथील कवी मोरोपंत शाळेच्या समोर  शशिकांत बाबासो कारंडे (वय 47 वर्ष) यांची तीन इसमांनी धारदार हत्यारानी मानेवर, डोक्यावर, शरीरावर, पायावर वार करून निर्घृण हत्या केली होती. याबाबत बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 379 /22 कलम भादवी 302, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आज तीन अल्पवयीन (सतरा वर्ष वयाच्या) मुलांना ताब्यात घेतलेले आहे. या मुलांनी शशिकांत बाबासो कारंडे यांचा खून केल्याचे कबूल केले आहे. यातील विधी संघर्षग्रस्त एका बालकाचा मयत यांच्या शेखर या मुलाशी एका मुलीच्या मैत्रीवरून वाद झाला होता. त्यावेळी सुद्धा त्याने फिर्यादींच्या मुलावर मे महिन्यात हल्ला केला होता. त्यावेळेस देखील पोलिसांनी त्याला आणि त्याचा दुसऱ्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना बाल न्यायालयापुढे हजर केले होते. अल्पवीयन आरोपीच्या पालकांनी त्याला नंतर बालन्यायालयातून सोडून आणले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तीनही अल्पवयीन मुले एकमेकांचे दोस्त असून सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. यातील मयताचा मुलगा आणि तिन्ही अपचारी बालक एकाच शाळेत पूर्वी शिकलेली आणि पूर्वी एकमेकांचे दोस्त होते. परंतु मुलींच्या मैत्रीवरून त्यांच्यात वाद झाला. यातील मयताचा मुलगा यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे ते आपल्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण करतो असा गैरसमज त्यांनी करून घेतला. त्याला मयत हे सुद्धा पाठीशी घालत आहेत असाही गैरसमज त्यांनी करून घेतला. (दोन लॉजवर पोलिसांची धाड, कारवाईत धक्कादायक माहिती समोर) मृतक शशिकांत यांनी वडीलकीच्या नात्याने त्यांना भांडण न करण्याबाबत एक-दोन वेळा समजवले होते. याचाही राग त्यांना होता. सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होण्याची त्यांना हौस होती. श्रीराम नगर भागात त्यांचा वचक व्हावा, असे कृत्य करावे व भविष्यात त्या ठिकाणी दबदबा निर्माण करावा असे सुद्धा एकंदरीत त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून दिसून येते. याच कारणास्तव त्यांनी शशिकांत कारंडे यांचा भर वस्तीत भर दिवसा खून केला होता. मयत शशिकांत काल त्यांच्या मुलीला घेण्यासाठी शाळेमध्ये आलेले होते. त्या मुलीचा या घटनेशी काहीही संबंध नाही. ती फक्त या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारी साक्षीदार आहे. सदर गुन्ह्याचा तपास करून सदर विधी संघर्षग्रस्त बालकांना ताबडतोब ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सर्वांची सोशल मीडियाची सखोल तपासणी सुरू आहे. या सर्व आरोपींवर रेगुलर कोर्टामध्ये खटला चालून शिक्षा होण्याबाबत पोलिसातर्फे पाठपुरावा केला जाणार आहे. (दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, रत्नागिरीत गोविंदाचा मृत्यू, धक्कादायक घटना) सर्व पालकांना तसेच शिक्षकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग आपण सर्वांनी मिळून करायला आवश्यक आहे. अल्पवयीन मुला-मुलींचे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअॅप हे सर्व पालकांनी वेळोवेळी त्यांना विश्वासात घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच ज्या अल्पवयीन मुलांची कौटुंबिक वातावरण चांगले नाही अशा मुलावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस सुद्धा आता याबाबत सोशल मीडिया मॉनिटरिंग करणार आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Baramati, Crime, Pune

पुढील बातम्या