मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, रत्नागिरीत गोविंदाचा मृत्यू, धक्कादायक घटना

VIDEO : दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, रत्नागिरीत गोविंदाचा मृत्यू, धक्कादायक घटना

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून एक अतिशय वाईट आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे.

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून एक अतिशय वाईट आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे.

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून एक अतिशय वाईट आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे.

शिवाजी गोरे, रत्नागिरी, 19 ऑगस्ट : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून एक अतिशय वाईट आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे. रत्नागितीर पाज पंढरी गावात एका गोविंदाचा दहीहंडीच्या उत्साहादरम्यान निधन झालं आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचत असताना या गोविंदाला अचानक हृदयविकराचा झटका आला. हा झटका इतका खतरनाक होता की कुणाला समजण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाज पंढरी गावातील वसंत लाया चौगले या गोविंदाचा नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यामध्ये वसंत चौगुले सहभागी झाले होते. पण नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली. ते जमिनीवर कोसळले. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित बातमी वाऱ्यासारखी पसरतात पंचक्रोशीतील गोविंदावर दुःखाचे सावट पसरले. मुंबईतही काही ठिकाणी दुर्घटना दहीहंडी उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहे. मुंबईच्या वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित भाजपच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात एक दुर्घटना घडली आहे. एक गोविंदा थेट सहाव्या थरावरुन कोसळला आहे. या दुर्घटनेत संबंधित गोविंदा हा जागेवरच बेशुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला बेशुद्ध अवस्थेतच केईएम रुग्णालयात नेण्यात आलंय. (दहीहंडीत मोठी दुर्घटना, थर रचताना तोल गेला आणि घात झाला, सहाव्या थरावरुन गोविंदा कोसळला) मुंबईच्या जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात थर रचताना एक गोविंदा सहाव्या थरावर पोहोचला होता. पण अचानक तोल गेला आणि तरुण थेट जमिनीवर कोसळला. या तरुणाचं नाव करण सावंत असं आहे. तो 22 वर्षांचा आहे. त्याला तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात आणलं गेलं. दरम्यान, गिरगाव कुंभारवाड्यातील ओमकार मित्र मंडळाचा एक गोविंदादेखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजिंक्य माने असं या गोविंदाचं नाव आहे. या गोविंदाला खांद्याला गंभीर दुखापती झाल्यामुळे केईएम रूग्णालयामध्ये आज त्याच्या खांद्याची सर्जरी करण्यात येणार आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या