जयपूर 09 ऑक्टोबर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये निर्दयी दरोडेखोरांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडत एका वृद्ध महिलेचे दोन्ही पाय कापले. या घटनेतील पीडितेचं वय सुमारे 108 वर्षे आहे. रविवारी पहाटे दरोडेखोरांनी ही घटना घडवली. पायातील चांदीचे कडे काढण्यासाठी दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने महिलेचे गुडघ्याखालील दोन्ही पाय निर्दयपणे तोडले. या दरम्यान असहाय्य वृद्ध महिलेला रडण्याशिवाय काहीच करता आलं नाही. या घटनेमुळे जयपूरमध्ये खळबळ उडाली असून लोक हादरले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या गलता गेट पोलीस स्टेशन हद्दीतील मीना कॉलनीमध्ये ही भीषण घटना घडली. दरोड्याची शिकार झालेली 108 वर्षीय जमुना देवी घरात एकटीच होती. रात्री ती आपल्या मुलीसोबत झोपली. रविवारी मुलगी लवकर उठून मंदिरात गेली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संधी पाहून दरोडेखोरांनी जमुनादेवीच्या घरात घुसून तिला ओढत बाहेर बाथरूममध्ये नेलं. तिथे त्यांनी वृद्ध महिलेच्या पायात घातलेलं कडं काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते काढण्यात त्यांना अपयश आलं. जेव्हा पोलिसानेच केली चोरी… Video व्हायरल झाल्यानंतर घटनेचा खुलासा यानंतर दरोडेखोरांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून धारदार शस्त्राने महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापले. दरोडेखोरांनी वृद्ध महिलेचे पाय आणि शस्त्र तिथेच फेकलं आणि कडं घेऊन पळ काढला. दरोडेखोरांनी वृद्ध महिलेच्या मानेवरही वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या वृद्ध महिलेचा त्रास सुरूच होता. नंतर तिच्या मुलीने आणि इतरांनी जमुनादेवीला पाहिलं. दरोड्याची माहिती परिसरात आगीसारखी पसरली. त्यावरून तिथे लोकांचा जमाव जमला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी जयपूर सिटी एफएसएलच्या टीमला घटनास्थळी पाचारण केलं. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. पोलिसांना घटनास्थळावरून जमुना देवीचा कापलेला पाय आणि शस्त्र सापडले आहे. घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. दरोडेखोरांची संख्या अद्याप समजू शकली नाही. 23 महिन्यांपासून बेपत्ता होती तरुणी; प्रियकराच्या घरात उत्खनन करताच बाहेर आलं धक्कादायक सत्य यापूर्वी राजस्थानमधील कोटा विभागातील बुंदी जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. त्यातही दरोडेखोरांनी वृद्ध महिलेचा पाय कापून त्यात घातलेले चांदीचे कडे काढून घेतले. बुंदी पोलिसांना आतापर्यंत दरोडेखोरांचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. त्यामुळे तेथील नागरिकांमध्येही नाराजी पसरली आहे. या संदर्भात बुंदीमध्ये अनेकवेळा समाजातील लोक आणि पीडितांच्या बैठका झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.