लखनऊ 09 ऑक्टोबर : 23 महिन्यांपूर्वी फिरोजाबाद जिल्ह्यात एका मुलीची तिच्या प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी हत्या केली होती. तिचा मृतदेह घरात पुरल्यानंतर त्यावर काही पोते ठेवण्यात आले होते. यानंतर घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंब फरार झालं. प्रियकर आपल्या कुटुंबासह नोएडामध्ये राहू लागला. आता पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. चौकशीनंतर आरोपीच्या घरात खोदकाम करून मुलीचा सांगाडा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरसागंज पोलीस स्टेशन हद्दीतील किठौत गावात राहणारी 20 वर्षीय तरुणी 21 नोव्हेंबर 2020 रोजी अचानक बेपत्ता झाली. याप्रकरणी मुलीच्या आईने घराशेजारी राहणारा चंद्रभान आणि अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 20 वर्षांच्या संसाराला लागली नजर, रागाच्या भरात पतीने उचलले पाऊल आणि… गुन्हा दाखल होताच गौरव घराला कुलूप लावून कुटुंबासह फरार झाला. गौरव आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच बेपत्ता मुलीचा खूप शोध घेतला गेला. मात्र कोणीच सापडलं नाही. याप्रकरणी पोलीस सातत्याने तपासात गुंतले होते. गुरुवारी पोलिसांना माहिती मिळाली की, गौरव हा हरियाणातील बल्लभगड (फरिदाबाद जिल्हा) येथे भाड्याच्या घरात राहतो. यानंतर पोलिसांनी छापा टाकून गौरवला अटक केली. यानंतर आरोपी गौरवची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने 23 महिन्यांपूर्वी प्रेयसीची हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर मृतदेह घरात पुरण्यात आला आणि घराला कुलूप लावून ते पळून गेले, असं त्याने सांगितलं. शनिवारी सायंकाळी आरोपी गौरवच्या सांगण्यावरून पोलिसांनी घर उघडलं असता तिथे मोठी झुडपंे वाढली होती. आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी उत्खनन केलं असता मुलीचा सांगाडा सापडला. पोलिसांनी सांगाडा पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारू पाजली; राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली आरोपी गौरवने 23 महिन्यांपूर्वी मुलीची हत्या केल्याचं पोलिसांसमोर उघड केलं, तेव्हा हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. कारण त्यांना वाटत होतं की आपली मुलगी जिवंत आहे आणि कदाचित ती आरोपीच्या ताब्यात आहे. सीओ अनिवेश सिंह म्हणाले की, ‘2020 मध्ये एक केस दाखल होती, ज्यामध्ये एक मुलगी बेपत्ता होती. पोलिसांच्या तपासात गौरव नावाच्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचं निष्पन्न झालं. गौरवला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने मुलीची हत्या करून तिला घरातच पुरल्याचं सांगितलं. आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.