मुंबई 9 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आपलं मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण जातं. परंतू सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जे पाहून तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण जाईल. खरंतर आपल्यासोबत काही चुकीचं झालं, भांडण झालं , चोरी किंवा इतर गोष्टी. तर आपण पोलिसात धाव घेतो. कारण आपल्याला विश्वास असतो की पोलीस आपल्याला मदत करतील, परंतू जर रक्षणकर्ताच लोकांची लूट करु लागला तर? लोकांनी कोणकडे जायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न उपस्थीत राहातो. एक प्रकरण केरळमधून समोर आले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, एका पोलीस कर्मचाऱ्याने एक फळ विक्रेत्याच्या दुकानातू चोरी केली आहे.
हे ही पाहा : VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका फळाच्या दुकानात फळांचा बॉक्स बेपत्ता झाला. ज्यानंतर तेथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून घटनेचा शोध घेतला गेला. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर या पोलिसाची तक्रार करण्यात आली. या पोलिसाचं नाव पीव्ही शिहाब असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीव्ही शिहाब
हे प्रकरण काही दिवसांपूर्वी घडले असले तरी आता या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा झाल्याचेही सांगण्यात आले. ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. हे ही पाहा : रात्रीच्यावेळी मेट्रोमध्ये महिला अचानक करु लागल्या अशी गोष्टी, Video पाहून बसेल धक्का या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास केला आणि अहवाल स्थानिक पोलीस अधीक्षकांना सादर केला. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण घटना कांजिरापल्ली मुंडकायम रोडची आहे जिथे हे फळांचे दुकान होते. खरंतर हा पोलिसवाला बाईकवरुन आला आणि त्याने आपली बाईक फळांच्या दुकानात थांबवली, तेथे कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर, तेथील बॉक्स उचलून पोलीस तेथून निघून गेला. मात्र, आता त्याची चोरी पकडली गेली तेव्हा त्याला आपल्या कृत्यामुळे मान खाली घालावी लागत आहे.