मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शिपाईच पुरवत होता कैद्यांना चरस, नागपूर जेलमधील धक्कादायक घटना

शिपाईच पुरवत होता कैद्यांना चरस, नागपूर जेलमधील धक्कादायक घटना

मंगेश हा दोन वर्षांपूर्वी कारागृहात पोलीस शिपाई पदावर रुजू झाला होता. मात्र, त्याचं वर्तन संशयास्पद....

मंगेश हा दोन वर्षांपूर्वी कारागृहात पोलीस शिपाई पदावर रुजू झाला होता. मात्र, त्याचं वर्तन संशयास्पद....

मंगेश हा दोन वर्षांपूर्वी कारागृहात पोलीस शिपाई पदावर रुजू झाला होता. मात्र, त्याचं वर्तन संशयास्पद....

नागपूर, 23 जानेवारी : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Nagpur jail ) चक्क पोलिसानेच (Police) आरोपींसाठी अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश सोळंकी असं या पोलिसाचं नाव आहे. मंगेश हा दोन वर्षांपूर्वी कारागृहात पोलीस शिपाई पदावर रुजू झाला होता. मात्र, त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्याने कारागृह अधीक्षकांनी इतर पोलिसांना त्याच्यावर नजर ठेवायला सांगितले होते.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो शेअर करुन मानले मोदींचे आभार!

शुक्रवारी मंगेश कारागृहात आल्यावर त्याची झडती घेण्यात आली. यात त्याच्या डाव्या पायाच्या सॉक्सच्या आतमध्ये 27 ग्राम चरस आढळून आली. या प्रकरणी धंतोली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खुद्ध वर्दीतील पोलीस कर्मचारी तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इश्काचा बाण सुटला, मेट्रोमध्ये राष्ट्रवादी नेत्याचे तृतीयपंथीयासोबत ठुमके, VIDEO

नागपूर जेलमध्ये चरस घेऊन जाण्याचा प्रकार हा गंभीर आहे. य प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

First published: