नागपूर, 22 जानेवारी : नागपूरकरांच्या सेवेसाठी मेट्रो सेवा (Nagpur Metro) सुरू झाली आहे. पण धावत्या मेट्रोमध्ये बर्थ डे पार्टीच्या नावाखाली अश्लिल चाळे आणि पत्तेबाजी करण्यात आलाचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 20 जानेवारीला नागपूर मेट्रोमध्ये जुगार आणि अश्लील डान्स करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. धक्कादायक म्हणजे, या घटनेचे आणखी काही व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार हे तृतीय पंथीयांसोबत अश्लील डान्स करत असताना पैसे उधळत असताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पुरुषांच्या घोळक्यात अनेक तृतीयपंथी असून हे सर्व त्या दिवशी मेट्रोमध्ये नेण्यात आले होते हे स्पष्ट झाले आहे.
जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांच्यासोबत काम करणाऱ्या शेखर शिरभाते यांच्या वाढदिवस होता.त्यानिमित्ताने मेट्रोच्या सेलिब्रेशन ऑन व्हील्स या योजनेअंतर्गत मेट्रो बुक केली गेली होती. मात्र, त्या दिवशी मेट्रोमध्ये तृतीयपंथी ना नाचवून थिल्लरपणा करण्यात आलं. मेट्रोमध्ये पैशाचा जुगार खेळण्यात आला. तसेच जोराजोरात गाणे वाजवून कायद्यांचा उल्लंघन करण्यात आले. भयंकर! हत्तीवर फेकला जळता टायर, माणसाच्या क्रुरतेचा आणखी एक बळी हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोने या प्रकरणाची तक्रार सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. सत्ताधारी पक्ष आणि गृह विभाग सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी असा गोंधळ घातल्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मेट्रोनंही याबाबत गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

)







