लखनऊ, 30 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) इंदिरानगर भागातील चुरामन गावाजवळील जंगलाबाहेर एका तरुणाचं शिर कापलेला मृतदेह (Dead Body) सापडला. मृतदेह चादरील बांधून एका खोक्यात बंद करून फेकण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या हत्येनंतर लपवण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला असावा. मृतदेह सापडल्यानंतर सायंकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे मृतदेहाचा डीएनए टेस्ट करण्याबाबत बोललं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुरामन गावाच्या बाहेर जंगलाच्या भागात या तरुणाचा मृतदेह सापडला. मृतदेहाला शिर नव्हतं. मृतदेह चादरीत गुंडालेला होता. मृतदेह इतका कुजला आहे की, त्याची ओळख पटवणं कठीण झालं आहे. तब्बल 15 दिवसांपूर्वी या तरुणाचा हत्या केल्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून बेपत्ता झालेल्यांची माहिती मागवली जात आहे. मृतदेह सडल्यामुळे त्याच्या शरीरावरील कोणतेही निशाण सापडत नाहीत. त्याशिवाय डोकं कोणी कापलं, वा कोणा प्राण्याने खाल्लं, याचाही तपास केला जात आहे. त्यासाठी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, यानंतर नेमकी बाब समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.