नागपूर, 28 मे : लग्न हे कुटुंबासाठी आनंद घेऊन येतं. अगदी मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत सर्वज जणांमध्ये लग्नाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. मात्र नागपूरमध्ये (Nagpur News) याच लग्नघरात शोककळा पसरली. मामाच्या लग्नात वरातीत नाचणाऱ्या भाच्याच्या मृत्यूमुळे घर हादरलं. काही वेळापर्यंत आनंदात नाचणाऱ्यांवर दु:खाचं सावट आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपुरातील खापा येथे घडली. घरात लग्न असल्याने कुटुंब आनंदात होतं. दरम्यान लग्न मंडपात वरात जात होती. याच वेळी सहा वर्षीय चिमुकला आपल्या मामाच्या लग्नात नाचत होता. त्याच वेळी घोड्याने त्याला लाथ मारली. यातच 6 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नवरदेवासह त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला. हशमेल सलमान शेख असं मृत बालकाचं नाव आहे.
मृतक हशमेल हा शिवा-सावंग येथील राहणारा असून तो आई-वडिलांसोबत मामाच्या लग्नासाठी खापा येथे आला होता. ज्यावेळी घटना घडली तेव्हा नवरदेव घोड्यावर बसलेला होता. बॅन्ड सुरू होता, आणि सर्वजण नाचत होती. यादरम्यान एकाने ओवाळणी म्हणून दहा रुपयांच्या नोटा उडवल्या. त्या घेण्यासाठी हशमेल घोड्यामागे गेला. त्याचवेळी घोड्याने हशमेलला लाथ मारली आणि तो जवळच्या दगडावर फेकला गेला. यानंतर तातडीने हशमेलला रुग्णालयात नेण्यात आलं.
मात्र डोक्याला मार लागल्यामुळे आतून गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुरड्याच्या मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.