चंदीगड, 29 मे : एक्टिवावरुन (Activa Ride) जाणाऱ्या तरुणीचा तपास केला असता पोलिसांना धक्काच बसला. ही घटना पंजाबमधील (Punjab News) लुधीयाना येथील आहे. येथे पोलिसांकडून गाड्यांचा तपास सुरू होता. यादरम्यान पोलिसांनी तरुणीला थांबवलं आणि अॅक्टिवाची डिक्की चेक करू लागले. यादरम्यान तरुणीच्या डिक्कीत नशेचे पदार्थ पाहून पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी तरुणीविरोधात नशेची तस्करी केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीचं नाव सोना असल्याचं समोर आलं आहे. सब इन्स्पेक्टर विजय कुमार यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमला यासंदर्भात सूचना मिळाली होती. त्यानुसार, अॅक्टिवावर एक तरुणी नशेच्या पदार्थांची तस्करी करते. ज्यानंतर सरकारी शाळेजवळ नाकाबंदी करीत तरुणीला अटक करण्यात आले. अशाच प्रकारे पोलिसांनी गावात राहणाऱ्या श्रवण सिंह याला 10 ग्रॅम हेरोइनसह अटक केली होती. हा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून तस्करी करीत होता. आरोपींना कोर्टासमोर सादर करीत पोलीस रिमांडवर पाठवण्यात आलं आहे. दुसरीकडे आरोपींची कडक चौकशी केली जात आहे. या तस्करीमागे मोठी साखळी आहे का, याचाही तपास केली जात आहे. सध्या तरुणांमध्ये नशेचं व्यसन वाढलं आहे. त्यामुळे तरुण तरुण मुलं अशा पदार्थांची तस्करी करीत असल्याचंही समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.