Home /News /crime /

प्रेमसंबंधातून मुलगी झाली, पण दोघात उडत होते खटके, नदीकाठी घेऊन गेला आणि....

प्रेमसंबंधातून मुलगी झाली, पण दोघात उडत होते खटके, नदीकाठी घेऊन गेला आणि....

आज सकाळी आदर्शनगर येथील पाण्याच्या खदानीमध्ये एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    आनिस शेख, प्रतिनिधी देहू रोड, 27 सप्टेंबर : अनैतिक संबंधातून एका 24 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून अद्याप एक जण फरार आहे. देहूरोड शहरातील आदर्श नगर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय प्रिया चव्हाण या महिलेचे मागील पाच वर्षांपासून प्रशांत गायकवाड याच्यासोबत प्रेम संबंध होते. तसंच त्यांना विवाहबाह्य संबंधातून पाच महिन्याची एक मुलगी सुद्धा आहे. प्रिया आणि प्रशांत यांच्यात नेहमी भांडणे होत असत.  विवाहबाह्य झालेल्या संबंधातून झालेल्या मुलीपासून सुटका मिळण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. तसंच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या प्रियाच्या भावाला तुरुंगातून सोडविण्याच्या मागणीतून  नेहमी प्रिया आणि प्रशांत यांच्यात कडाक्याचे भांडण होत होते. खळबळजनक! हजारो सरकारी कामगारांना दिली कोरोनाची असुरक्षित लस दोन दिवसांपूर्वी अशाच वादातून मयत प्रिया तसंच आरोपी या दोघांमध्ये भांडणे झाली होती. त्यानंतर आरोपी प्रशांत याने शुक्रवारी रात्री राहत्या घरातून प्रियालासोबत घेतले आणि आदर्शनगर येथील पाण्याच्या खदाणीजवळ नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पाण्यात फेकून दिला. प्रिया दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याबाबतची तक्रार प्रियाची लहान बहीण रेश्मा हिने देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रियाचा शोध घेत असताना तपासाची चक्रे फिरवली. काळेवाडी पिंपरी येथून प्रशांत गायकवाड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या दोन मित्रासोबत प्रिया चा खून केल्या असल्याची कबुली तपास अधिकारी अशोक जगताप तसेच त्यांच्या पथकाला दिली. अखेरची ठरली पूजा, एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यासह महिलेचा नदीत बुडून मृत्यू आज सकाळी आदर्शनगर येथील पाण्याच्या खदानीमध्ये एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहानिशा केली असता आरोपी प्रशांत यानेच प्रियाचा मृतदेह खदानीत टाकला असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी प्रशांतसह त्याचा मित्र विक्रम रोकडे यास ताब्यात घेतले असून अद्याप तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: देहूरोड

    पुढील बातम्या