बीजिंग, 27 सप्टेंबर : एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना चीनच्या सरकारी कंपन्यांनी कामगारांना अनधिकृत कोव्हिड-19 लस दिली आहे. कामगारांनंतर ही लस सरकारी अधिकारी आणि लस कंपनीतील कर्मचार्यांना दिली जाणार आहे. यानंतर, शिक्षक, सुपरमार्केट कामगार आणि धोकादायक भागात प्रवास करणारे लोक असतील. मुख्य म्हणजे लोकांचा देण्यात येणारी ही चिनी लस जागतिक स्तरावर प्रमाणित नाही आहे. असे असूनही, चिनी अधिकारी पारंपारिक स्क्रिनिंग प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून हजारो लोकांना लसीकरण करीत आहेत.
लशीच्या परिणामाची चिंता न करता सरकार ज्यांचे काम महत्वाचे वाटेल अशा कामगारांमध्ये ही लस देत आहे. या महत्त्वपूर्ण कामगारांमध्ये औषधनिर्माण संस्थाच्या कर्मचार्यांचा समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांना ही लस देण्याचे सरकारी अधिकारी विचार करीत आहेत.
वाचा-'मी हिमालयात होते; सोशल डिस्टन्सिंगही पाळलं आणि तरीही मला कोरोना झाला'
लोकांचा जीव धोक्यात टाकत आहे चीन
या लशीबाबत चीन अंत्यत घाई करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. इतर कोणत्याही देशाने इतक्या मोठ्या प्रमाणात असुरक्षित लशींचे इंजेक्शन दिले नाहीत. बहुतेक सर्व लस तिस ऱ्या टप्प्यात किंवा अंतिम टप्प्यात आहेत. या चाचण्यांमध्ये सामील असलेल्या लोकांचे बारकाईने निरीक्षण केले जाते.
वाचा-पॉझिटिव्ह बातमी! Coronavirus शी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या
कंपन्यांनी बेकायदेशीर करारांवर स्वाक्षर्या केल्या आहेत
कंपन्यांनी लस घेणार्या लोकांना या लशी संबंधित माध्यमांशी बोलण्यापासून रोखण्यासाठी बेकायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मर्डोक चिल्ड्रन रिसर्च इन्स्टिट्यूटचे बालरोग तज्ज्ञ डॉ. किम मलहोलँड यांनी कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची चिंता व्यक्त केली, की त्यांना नकार देणे कठीण होऊ शकते. चीनमधील कोरोनाची लस किती लोकांना मिळाली हे या क्षणी स्पष्ट झालेले नाही. बीजिंगमधील कंपनी सायनोवाक यांनी सांगितले की बीजिंगमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांना त्याची लस देण्यात आली आहे.