अखेरची ठरली पूजा, एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यासह महिलेचा नदीत बुडून मृत्यू

अखेरची ठरली पूजा, एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यासह महिलेचा नदीत बुडून मृत्यू

उपचारासाठी जात असताना वाटेतच पुष्पा दिलीप चवरे या महिलेचा मृत्यू झाला.

  • Share this:

अमरावती, 27 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदीत कुटुंबासह आंघोळ व पूजेसाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

यश प्रमोद  चवरे, (वय 11), जीवन प्रदीप चवरे (वय15) , सोहम दिनेश झेले (12) असे मृतक चिमुकल्यांची नाव आहे. तर  बेबी प्रदीप चवरे (वय 35), पुष्पा दिलीप  चवरे (32), राधा गोपाळराव  मलीये (38) अशा प्रकृती चिंताजनक असलेल्या महिलांची नाव आहे. मात्र, उपचारासाठी जात असताना वाटेतच पुष्पा दिलीप चवरे या महिलेचा मृत्यू झाला.

हे सर्व धामणगाव रेल्वे तालुक्यातील  निंभोरा राज या गावातील रहिवासी आहे. सध्या अधिक मास असल्यामुळे बेलदार परिवारातील हे कुटुंबीय आज सकाळी सहा वाजता दरम्यान आंघोळ आणि पूजा करण्यासाठी गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदी येथे गेले होते.

मृतक जीवन प्रदीप हा आपल्या आई बेबी सोबत गेला होता. जीवन हा  धामणगाव येथील हायस्कूलमध्ये यंदा दहावी वर्गात शिकत होता. जीवनची आई बेबीची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतक यश हा याच  हायस्कूलमध्ये सहावीत शिक्षण घेत होता. तर सोहम गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता.  जखमी पुष्पा ही येथील पोलीस पाटील दिलीप चवरे यांची पत्नी आहे.  चवरे कुटुंबासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: sachin Salve
First published: September 27, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या