उल्हासनगर, 09 फेब्रुवारी : ‘डेबिट (debit card ) आणि क्रेडिट कार्डची (credit card) माहिती कुणाला देऊ नका, कुणालाही ओटीपी (OTP) नंबर सांगू नका’ अशी सूचना वारंवार बँकेकडून केली जात असते. पण, बरेच जण याकडे कधी कधी दुर्लक्ष करता आणि आर्थिक नुकसानीला सामोरं जातात. उल्हासनगरमध्ये तर एका व्यापाऱ्याने डेबिट कार्डवरच एटीएम पिन नंबर लिहून ठेवला होता, त्यामुळे चोराने लगेच अकाऊंटमधून रक्कम गायब केली होती. एटीएम कार्ड वर पासवर्ड लिहणे उल्हासनगर मधील एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. उल्हासनगर कॅम्प तीन भागात राहणारे नितेश चावला यांचे फुटवेयरचे दुकान आहे. 3 फेब्रुवारीच्या दिवशी खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अली शेख आणि सऊद खान यांनी दुकान मालकाची नजर चुकवून त्याची पर्स चोरली होती. शशांक केतकर दिसणार नव्या भूमिकेत; प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली त्यांच्या या पर्समध्ये बँकेचे एटीएम कार्ड सुद्धा होते. विशेष म्हणजे, डेबिट कार्डचा नंबर विसरू नये म्हणून त्यांनी कार्डवरच पासवर्ड लिहून ठेवला होता. मग काय चोराला चालून संधी आली होती. दोघांनी अलगदपणे एटीएममधून 25 हजारांची रक्कम लंपास केली होती. डेबिट कार्ड चोरीला गेल्यामुळे नितेश चावला यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी एटीएम मशीनच्या वापरावून माग काढला आणि दोन्ही चोरट्यांनी भिवंडीत अटक केली. या दोन्ही भामट्यांकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि पर्स ताब्यात घेतली आहे. वेळीच पोलीस तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांनी दोन्ही चोरांना अटक करण्यात यश मिळवले.
खराब झालेल्या भाजीपाल्यापासून होते वीजनिर्मिती, पंतप्रधानांनीही केलं कौतुकएटीएम किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्याची माहिती कुणालाही देऊ नका जर पासवर्ड लक्षात राहत नसेल तर तो कुणाच्या हाती लागेल अशा ठिकाणी लिहून ठेवू नका, असं आवाहन उल्हासनगर पोलिसांनी केले आहे.