मुंबई, 9 फेब्रुवारी: झी मराठी वरील ‘होणार सून मी या घरची’ ह्या मालिकेमधून शशांकला प्रत्येक घरात ‘श्री’ अशी ओळख मिळाली. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होत आणि त्यातली सगळीच पात्र प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरली होती. तोच शशांक आता पुन्हा एकदा एका नवीन मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला झी मराठी वरच येत आहे. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत स्वतः शशांकने ही माहिती दिली आहे. ‘पाहिले न मी तुला’, असं त्याच्या आगामी मालिकेचं नाव आहे. पोस्ट मध्ये शशांक म्हणतोय की, ‘ पाहिले न मी तुला! हे गाणं जसं सगळ्यांच्या आवडीचं आहे, तशीच ही नवीन मालिका आणि भूमिका सुद्धा सगळ्यांच्या आवडीची होऊदे हीच बाप्पा चरणी प्रार्थना !!
त्याचबरोबर त्याने आपल्या आशय कुलकर्णी आणि तन्वी मुंडले या सहकलाकारांनी नावेदेखील जाहीर केली आहेत. अभिनेता आशय कुलकर्णी म्हणजेच ‘ माझा होशील ना’ या मालिकेमधील सुयश सुद्धा आपल्याला या नव्या मालिकेत दिसणार आहे.’ माझा होशील ना’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून सुद्धा आशयने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसेच तन्वी मुंडले हा एक नवीन चेहरा या मालिकेसोबत जोडला जाणार आहे.
हे देखील वाचा - Rajiv Kapoor: पहिल्याच सिनेमातून रातोरात स्टार; पण वादग्रस्त आणि बोल्ड नायिकेचीच झाली अधिक चर्चा
चाळीस सेकंदाच्या ह्या प्रोमोमध्ये सुद्धा शशांक रुबाबदार दिसुन येत आहे. तसेच या तन्वी ही त्याच्या ऑफिस मध्ये काम करणारी कर्मचारी दाखवली आहे. आता या मालिकेच कथानक नक्की काय असेल ह्याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसुन येत आहे. 1 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

)







