Home /News /national /

याठिकाणी खराब झालेल्या भाजीपाल्यापासून होते वीजनिर्मिती, पंतप्रधानांनीही केलं कौतुक

याठिकाणी खराब झालेल्या भाजीपाल्यापासून होते वीजनिर्मिती, पंतप्रधानांनीही केलं कौतुक

भाजीपाला, दूधसेवा, पेपर यांना कडक निर्बंधांतून हटविण्यात आलं आहे.

भाजीपाला, दूधसेवा, पेपर यांना कडक निर्बंधांतून हटविण्यात आलं आहे.

हैदराबादच्या बोवनपल्ली मार्केटमध्ये दररोज सुमारे 10 टन कचरा निघतो. ज्यापासून 500 युनिट वीज निर्मिती केली जाते. याव्यतिरिक्त सेंद्रिय खतदेखील बनविले जात आहे.

    सिकंदराबाद, 09 फेब्रुवारी: भाजीपाला खराब झाला तर आपण काय करतो? एक तर कचऱ्यामध्ये फेकून देतो किंवा त्यापासून खत बनावं म्हणुन कुंडीत टाकतो. पण खराब झालेल्या भाज्यांपासून वीज सुद्धा निर्माण करता येऊ शकते असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? तर हे खरं केलं आहे हैदराबादमध्ये. याठिकाणी एक असा भाजीबाजार आहे जिथे खराब झालेल्या भाज्यांपासून वीजनिर्मिती केली जाते. इथल्या बोवनपल्ली मंडईमध्ये दररोज सुमारे 10 टन कचरा गोळा केला जातो. पूर्वी तो  टाकून दिला जायचा  परंतु आता या सेंद्रिय कचर्‍यामधून दररोज सुमारे 500 युनिट वीज निर्मिती केली जात आहे. काय आहे या भाजी बाजाराचा इतिहास? बोवनपल्ली हा हैदराबादच्या सीमेवरील सिकंदराबादमधला एक मोठा भाजीबाजार आहे. हे मार्केट सुमारे 55 वर्ष जुनं आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांची या मार्केटमध्ये ये- जा सुरु होती. त्यामुळे येथील दुकानदार त्या काळात देखील जागरुक होते. आणि आता याचं जनजागृतीने एक शोधही लावला आहे. स्थानिक दुकानदार आणि ग्राहक दररोज येथून बऱ्याच टन भाज्या खरेदी करतात. यानंतरही बऱ्याच भाजीपाला उरतो आणि कुजल्यामुळे सुमारे 10 टन भाज्या फेकून दयाव्या लागतात. सडलेल्या भाजीतून एक शोध लागला हाच सडलेला भाजीपाला जो सुरुवातीला फेकून दिला जात होता तो आता वीजनिर्मितीच्या कामाला उपयोगी येऊ लागला आहे. त्यातून दररोज सुमारे 500 युनिट वीज आणि सेंद्रीय कचर्‍यापासून 30 किलो बायोगॅस देखील तयार केला जात आहे. 500 युनिट वीज ही 100 स्ट्रीट लाइट्स, मंडीतले 170 स्टॉल, 1 प्रशासकीय इमारत आणि तिला पाणीपुरवठा इत्यादीसाठी पुरेशी आहे. याशिवाय 30 किलो बायोगॅस हा ह्या मंडईच्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवण्यासाठी दिला जात आहे. (हे वाचा -  मोबाईलप्रमाणं अपग्रेड होतात नोकऱ्या, 'या' गोष्टींची काळजी घेणं आहे गरजेचं) अशाप्रकारे बनवली जाते वीज भाज्यांपासून खत तयार करणे सोपं आहे, परंतु वीज तयार करण्याची प्रक्रिया थोडीशी किचकट आहे. या प्रक्रियेत भाजीपाल्याचा कचरा हा पहिल्यांदा कन्वेयर बेल्टवर ठेवला जातो. त्यामुळे कचरा बारीक होऊन त्याचा एक ढीग तयार होतो जो नंतर एक प्रकारे मिश्रण तयार होते. यानंतर, हे मिश्रण मोठ्या कंटेनर किंवा खड्ड्यांमध्ये टाकले जाते  जेणेकरुन त्याचं जैवइंधन तयार होईल. या जैवइंधनात कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन गॅस असतो. हे इंधन जनरेटरमध्ये वापरले जाते, जे वीज तयार करते. कोणी केली सुरुवात? सुरुवातीला हा सगळा भाजीपाला हा कचऱ्यात फेकून दिला जात होता पण नंतर मात्र ही कल्पना समोर आली. हैदराबादस्थित सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) च्या वैज्ञानिकांनी त्यावर काम सुरू केले आणि आता त्याचे पेटंटही घेण्यात आले आहे. सध्या IICT च्या देखरेखीखाली एक इंजिनीअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे काम करत आहे. आतापर्यंत किती वीज बनली आहे? या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावणारे वैज्ञानिक डॉ. ए.जी. राव यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत  सुमारे 1400 टन भाजीपाला अशा प्रकारे विजेमध्ये रूपांतरित झाला आहे. आणि त्याद्वारे सुमारे 32,000 युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्याचसोबत सुमारे 700 किलो खत तयार केलं गेलं जे की शेतीसाठी वापरलं जात आहे. (हे वाचा -   Twitter चा पर्याय Koo तसा आता Whatsapp लासुद्धा आला स्वदेशी पर्याय - Sandes) पंतप्रधान मोदींनी केले कौतुक पंतप्रधान मोदी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नेहमीच देशातील वेगवेगळया उपक्रमांचं कौतुक करत असतात. हैदराबादच्या या भाजी मंडई संदर्भात वैज्ञानिकांच्या प्रयोगाचा उल्लेख देखील त्यांनी आपल्या कार्यक्रमात केला होता. येथील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या प्रयोगामुळे बाजार समितीचे वीज बिल दरमहा सुमारे दीड लाख रुपयांनी कमी झाले आहे.
    Published by:news18 desk
    First published:

    Tags: Hyderabad, Pm narendra mdi, Research

    पुढील बातम्या