Home /News /crime /

5 महिन्यांनंतर कबरीतून बाहेर काढावा लागला मृतदेह, न्यायालयानं का दिला असा आदेश?

5 महिन्यांनंतर कबरीतून बाहेर काढावा लागला मृतदेह, न्यायालयानं का दिला असा आदेश?

जवळपास पाच महिन्यांपूर्वी दफन केलेला एका पितळ व्यापाऱ्याचा मृतदेह (Dead Body) पुन्हा बाहेर काढावा लागला आहे. या मृत्यूचं कारण नेमकं काय होतं हे शोधण्यासाठी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन (Postmortem) करण्यात आलं आहे

    वाराणसी 11 एप्रिल : मुरादाबाद येथील गलशहीद ठाण्याच्या क्षेत्रात जवळपास पाच महिन्यांपूर्वी दफन केलेला एका पितळ व्यापाऱ्याचा मृतदेह (Dead Body) पुन्हा बाहेर काढावा लागला आहे. या मृत्यूचं कारण नेमकं काय होतं हे शोधण्यासाठी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन (Postmortem) करण्यात आलं आहे. मृत्यू झाला त्यादिवशी या व्यक्तीच्या मुलानं कायदेशीर प्रक्रियेला नकार दिला होता. मात्र, नंतर व्यापाऱ्याच्या पत्नीनं भाच्यांवर हत्येचा (Murder) आरोप करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार गलशहीद पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. गलशहीदच्या मोहल्ला असालतपुरा येथील रहिवासी जमील अहमद (वय 60) हे पितळाचे व्यापारी होते. त्यांचा मुलगा जीशान दुबईमध्ये नोकरी करतो. मुलीचं लग्न झालं आहे आणि ती न्यूझीलंडमध्ये राहाते. अमील अहमद मुरादाबादमध्ये आपली पत्नी शादमा परवीन यांच्यासोबत राहात होते. जवळपास पाच महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जेव्हा त्यांच्या मुलाला मिळाली तेव्हा त्यानं कोरोनामुळे कायदेशीर कारवाईस नकार दिला आणि त्यांचा मृतदेह तसाच दफन करण्यात आला. रक्षक बनला भक्षक; ती सुरक्षित कुठे? चालत्या कारमध्ये पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार पतीच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी शादमा परवीन आपला भाऊ मोहम्मद शमशादसोबत आपल्या घरी राहातो. काही दिवसांपूर्वी शादमा परवीन यांनी एसएसपींना पत्र लिहित आपल्या पतीची हत्या झाल्याचा आरोप केला. सांगितलं गेलं, की जमील अहमद यांचं घराच्या बांधकामावरुन आपल्या भाच्यांसोबत भांडण झालं होतं. यानंतर भाच्यांनी त्यांना मारहाण केली आणि धारदार शस्त्रानं त्यांची हत्या केली. शादमा म्हणाल्या, की त्यावेळी मुलाच्या सांगण्यामुळे त्या शांत राहिल्या. त्यांनी न्यायालयातही याप्रकरणी धाव घेतली. न्यायालयानं याप्रकरणी तक्रार दाखल करून कारवाई करण्याचा आदेश दिला होता. एसएचओ गलशहीद कपिल कुमार यांनी सांगितलं, की न्यायालयाच्या आदेशानुसार आणि अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शनिवारी कबरमधून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dead body, Murder, Postmortem

    पुढील बातम्या