Home /News /crime /

रक्षकच बनला भक्षक; ती सुरक्षित कुठे? चालत्या कारमध्ये पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार

रक्षकच बनला भक्षक; ती सुरक्षित कुठे? चालत्या कारमध्ये पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार

एका तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार (Rape) करण्यात आला. तरुणीचा आरोप आहे, की कासगंजमध्ये कामाला असणाऱ्या पोलीस हवालदारानं (Police Constable) तिच्यावर बलात्कार केला आहे.

    वाराणसी 11 एप्रिल : देशात सतत बलात्कारासारख्या (Rape) गंभीर घटना घडत असल्याचं वृत्त समोर येत राहातं. याची तक्रार करण्यासाठी पीडिता पोलिसांचा आधार घेते. मात्र, जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा काय? अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जनपदमध्ये. इथे एका तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला. तरुणीचा आरोप आहे, की कासगंजमध्ये कामाला असणाऱ्या पोलीस हवालदारानं (Police Constable) तिच्यावर बलात्कार केला आहे. आरोपी हवालदार कासगंज जिल्ह्यातील पटियाली ठाण्यात तैनात आहे. पीडितेनं याबाबत घिरोह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बँड-बाजासह बलात्काराच्या आरोपीच्या घरी पोहचले पोलीस, Video Viral घिरोह ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असणारी तरुणी शुक्रवारी सकाळी औषधं घेण्यासाठी शिकोहाबाद सरकारी रुग्णालयात गेली होती. संध्याकाळी सुमारे साडेचार वाजता ती बसनं आपल्या घरी परतत होती. जनपद फिरोजाबादजवळ तिला आपल्याच गावातील रहिवासी धर्मेंद्र उर्फ भूरा दिसला. त्यानं तरुणीला गावापर्यंत सोडतो असं म्हटलं. तिच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये गावातीलच एक युवक प्रदीपही होता. युवती कारमध्ये बसली. पीडितेचा असा आरोप आहे, की रस्त्यात धर्मेंद्र तिच्यासोबत छेडछाड करू लागला. यानंतर तिला एका सुनसान ठिकाणी घेऊन गेले. यानंतर धर्मेंद्रनं प्रदीपच्या मदतीनं तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला एका मंदिराजवळ सोडून ते तिथून निघून गेले. तिला धमकीही दिली, की तक्रार केली तर जीवे मारेल. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. पीडितेनं सांगितलं, की आरोपी धर्मेंद्र सध्या पटियाली ठाण्यात हवालदार म्हणून काम करतो. पोलिसांनी सांगितलं, की आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आणि त्याचा साथीदार दोघंही फरार झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Rape, Rape news

    पुढील बातम्या