रायपूर, 19 जून : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) बालोद जिल्ह्यातील अर्जुंदा पोलीस ठाणे हद्दीतील नवागाव रेहची मार्गावर एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. महिलेने रात्रीचे कपडे घातले आहे आणि रस्त्यावर पडलेली होती. सुरुवातील स्थानिकांना वाटलं की, महिला दुसऱ्या भागातील असावी. यानंतर पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. पोलिसांनी याचा तपास सुरू केला. यादरम्यान महिला याच भागातील असल्याचं समोर आलं. मृतदेहाचं परीक्षण केल्यानंतर कळालं की, महिला एका हाताने दिव्यांग आहे. आजूबाजूला चौकशी केली असता मृत महिलेचं नाव भारती मंडावी असल्याचं समोर आलं. महिलेची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेडिकल तपासानंतर नेमकी घटना समोर येईल. फॉरेन्सिक टीमदेखील याचा तपास करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेसोबत नेमकं काय घडलं हे वैद्यकीय तपासणीनंतरच समोर येईल. महिलेच्या मृतदेहाचे पाय आणि हात रश्शीने बांधलेले होते, असंही त्यांनी सांगितलं. शेतात जाणाऱ्या गावकऱ्यांना 8 वाजल्यानंतर महिलेचा मृतदेह दिसला. काही स्थानिकांचं म्हणणं आहे की, अज्ञान बाईकवरुन आले आणि महिलेला भररस्त्यात फेकून निघून गेला. काहींनी सांगितलं की, महिला देवार जातीशी संबंधित आहे आणि कोणासोबत तरी सकाळी हिचं लग्न झआलं होतं. तेथे तिच्यासोबत मारहाण झाली. ज्यानंतर ती व्यक्ती महिलेला घेऊन तिच्या गावी गेला. यानंतर तिला बाईकवर बांधून घेऊन जात होते. मात्र महिलेला का मारलं, ती कोण व्यक्ती होती, याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.