रायपूर 18 जून : झारखंडची राजधानी रांची इथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका प्रियकराने घरात घुसून प्रेयसी आणि तिच्या भावाची हातोड्याने मारहाण करून हत्या केली आहे (Man Killed Minor Girl and her Brother). आरोपीने मुलीच्या आईवरही जीवघेणा हल्ला केला, तिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रिम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे . मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रांचीच्या जनकपूर परिसरातील आहे. जिथे 12वीत शिकणारी 17 वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या 14 वर्षीय भावावर आरोपीने घरात घुसून हल्ला केला. या घटनेतील मुख्य आरोपी विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करत असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना शनिवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घडल्याचं सांगण्यात येत आहे (Murder due to One Sided Love). दमलेल्या पत्नीनं प्रचार करण्यास दिला नकार, भाजपा नेत्यानं केली हत्या! आणि.. या हल्ल्यात मरण पावलेली श्वेता आणि तिचा भाऊ प्रवीण दोघेही रांचीच्या बरियाटू येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिकत होते. दोघेही आई चंदा देवीसोबत जनकपूर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते, तर त्यांचे वडील संजीव कुमार सिंग अबुधाबीमध्ये काम करतात. रिम्समध्ये असलेल्या चंदा देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची मुलगी श्वेता हिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या रोहन नावाच्या तरुणासह इतर दोन जण सकाळी घरात घुसले. त्यांनी तिघांवर हातोडा आणि चाकूने हल्ला केला. 5 वर्षांच्या मुलाचा दाबला गळा अन् आईनेही गळफास घेऊन संपवला जीव, जळगावमधील घटना शनिवारी सकाळी परिसरातील लोकांना घराबाहेर रक्त वाहताना दिसलं, तेव्हा कोणीतरी रांचीमध्ये राहणाऱ्या चंदा देवी यांचे वडील दयाशंकर सिंह यांना माहिती दिली. ते धावतच घटनास्थळी पोहोचले आणि मग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यावेळी प्रवीण आणि त्याची आई चंदा देवी यांचा श्वास सुरू होता. दोघांनाही रिम्समध्ये नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच प्रवीणचा मृत्यू झाला. विद्यार्थिनी श्वेता हिच्या कुटुंबीयांमध्ये आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणामध्ये पूर्वीही वाद झाला होता आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचलं होतं. या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. रांची सिटी एसपी अंशुमन यांनी सांगितलं की, मारेकऱ्याची ओळख पटली आहे. त्याच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.