मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हत्या करून पेटीत भरला होता 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह, हत्येचं कारण आलं समोर!

हत्या करून पेटीत भरला होता 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह, हत्येचं कारण आलं समोर!

दिवा खाडी किनारी एका लोखंडी पत्र्याच्या पेटीमधून दुर्गंध येत होती, पेटी उघडली असता रजतचा मृतदेह आढळून आला.

दिवा खाडी किनारी एका लोखंडी पत्र्याच्या पेटीमधून दुर्गंध येत होती, पेटी उघडली असता रजतचा मृतदेह आढळून आला.

दिवा खाडी किनारी एका लोखंडी पत्र्याच्या पेटीमधून दुर्गंध येत होती, पेटी उघडली असता रजतचा मृतदेह आढळून आला.

ठाणे, 15 मे : ठाण्यातील दिवा-शिळफाटा रोड (Diva-Shilphata Road) दिव्याच्या खाडीमध्ये एका लाल रंगाच्या पेटीमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून या तरुणाची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत नायक (वय 35 ) (Rajat nayak) असं मृत तरुणाचे नाव आहे. तो ओरीसा येथील रहिवासी होता. मुंबईतील काजूपाडा बोरीवली इथं कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होता. रजतचा मृतदेह दिव्याच्या खाडीत एका पेटीत आढळून आला होता.

'जान मी तुझीचं आहे पण..'आत्महत्येपूर्वी अल्पवयीन मुलीनं बॉयफ्रेंडला लिहिलं पत्र

दिनांक 13 मे 2021 रोजी सायंकाळी 6.45 च्या सुमारास दिवा-शिळफाटा रोड लगत असलेल्या दिव्यातील खर्डीगाव याठिकाणी दिवा खाडी किनारी एका लोखंडी पत्र्याच्या पेटीमधून दुर्गंध येत असल्याची माहिती अग्निशमन केंद्रामध्ये प्राप्त झाली. सदर घटनास्थळी मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली असता, सदर लोखंडी पत्र्याच्या पेटीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला होता. हत्या करून हा मृतदेह पेटीत कोंबून या ठिकाणी फेकून दिला होता. मृतदेह कुजला होता. घटनास्थळी मुंब्रा पोलीस कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये अमिता रमेश भावडा यांनी रजत यांची बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह रजत नायक याचा असल्याची ओळख पटली.

.. हा कोणता शॉट होता? विचित्र बॅटिंग पाहून तुम्हीही चक्रावाल - VIDEO

या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी अखेर दोनच दिवसांत हत्येचा छडा लावला आहे. डायघर पोलिसांनी 2 जणांना अटक केले आहे. लैंगिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पत्रकार परिषद घेवून हत्या कशी आणि का करण्यात आली होती, याचा खुलासा करणार असं पोलिसांनी सांगितले आहे.

First published: