'जान, मी फक्त तुझीचं आहे, पण...' आत्महत्येपूर्वी अल्पवयीन मुलीनं बॉयफ्रेंडला लिहिलं पत्र

'जान, मी फक्त तुझीचं आहे, पण...' आत्महत्येपूर्वी अल्पवयीन मुलीनं बॉयफ्रेंडला लिहिलं पत्र

Suicide News: प्रियकरासोबतच्या नात्यात दुरावा आल्यामुळं एका अल्पवयीन मुलीनं राहत्या घरात गळफास (Minor girl suicide) घेऊन आत्महत्या केली आहे. मृत मुलीनं आत्महत्येपूर्वी आपल्या कुटुंबासोबत, मैत्रिण आणि प्रियकराला उद्देशून एक भावनिक पत्र (Suicide note) लिहिलं आहे.

  • Share this:

भागलपूर, 15 मे: प्रियकरासोबतच्या नात्यात दुरावा आल्यामुळे एका अल्पवयीन मुलीनं राहत्या घरात गळफास (Minor girl suicide) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मृत मुलीनं आत्महत्येपूर्वी आपल्या कुटुंबासोबत, मैत्रिण आणि प्रियकराला उद्देशून एक भावनिक पत्र (Suicide note) लिहिलं आहे. तिने आपल्या मनातील वेदना या पत्राच्या सहाय्यानं  बोलून दाखवल्या आहेत. आपल्या 17 वर्षाच्या मुलीनं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनचं सरकली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

संबंधित मृत मुलीचं नाव शिवानी असून ती बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सुल्तानगंज येथील रहिवासी आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शिवानी आंघोळीला जाते असं सांगत घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली. याठिकाणी तिनं गडबडीत सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. दीड तास उलटूनही मुलगी खाली का आली नाही? असा प्रश्न मृत मुलीच्या आईला पडला. त्यामुळे त्यांनी मृताच्या लहान बहिणीला वरच्या मजल्यावर पाठवलं. पण वरच्या रुमचं दार बंद होतं. तसेच आतून काही प्रतिक्रियाही दिली नाही. त्यामुळे आईही वरच्या मजल्यावर आली. यानंतर घरातील सदस्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा शिवानीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला पाहून घरच्यांना धक्काच बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवानीचं तिच्याच गावातील एका कुणाल नामक मुलासोबत प्रेमसंबंध होतं. पण गैरसमज झाल्यामुळं दोघांत दुरावा निर्माण झाला होता. विरह सहन न झाल्यानं शिवानीनं स्वतःला संपवलं. यावेळी तिनं आपली मैत्रिण अमृता, बॉयफ्रेन्ड कुणाल आणि कुटुंबीयांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलं आहे. तिनं आपल्या पत्रात लिहिलं की, अमृता आज मी माझ्या प्रेमाला आणि कुटुंबाला तुझ्यामुळं आणि अमनमुळं (अमृताचा बॉयफ्रेन्ड) सोडत आहे. तुझ्यामुळेच सर्वजण माझ्याकडे संशयाच्या नजरेनं पाहत आहेत.

हे वाचा-बायकोनं आत्महत्या केल्याचं समजताच नवऱ्यानं ऑफिसातच उचललं टोकाचं पाऊल

मृत शिवानीनं पुढे पत्रात म्हटलं की, 'जान, मी कुठेही व्यस्त नव्हते. माझा फोन अमृतानं घेतला होता. कारण तिला अमनसोबत बोलायचं होतं. मी तुझीच आहे, आणि कायम तुझीच राहणार आहे. आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, असं शिवानीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. यावेळी तिनं आपल्या कुटुंबाला उद्देशून देखील दोन ओळी लिहिल्या आहेत. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं की,  'My Lovely All Family, मी कुणालवर खूप करते. मला माहित आहे की, तुम्हाला तो आवडत नाही. परंतु मला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं होतं. मी तुम्हाला खूप त्रास दिला. आता यापुढे काहीही त्रास देणार नाही. सर्व आनंदात राहा, तुमची शिवानी.

Published by: News18 Desk
First published: May 15, 2021, 12:37 PM IST

ताज्या बातम्या