लंडन, 15 मे : इंग्लंडमध्ये सध्या कौंटी चॅम्पियनशीप (County championship) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील एसेक्स विरुद्ध डर्बीशायर (Essex vs Derbyshire) या सामन्यातील दुसरा दिवस इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममधील सदस्य डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) यानं गाजवला. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. लॉरेन्सनं दुसऱ्या दिवशी याची कसर भरुन काढली.
लॉरेन्सनं अगदी वन-डे च्या स्टाईलनं फटकेबाजी केली. त्यानं 133 बॉलमध्ये नाबाद 152 रन काढले. यामध्ये 16 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. लॉरेन्सनं 150 रनचा टप्पा गाठताना एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स आणि एक फोर लगावला. यावेळी त्यानं मारलेला एक विचित्र शॉट पाहून सर्वच चक्रावले.
डर्बीशायरविरुद्ध लॉरेन्स पूर्ण रंगात होता. मैदानाच्या सर्व बाजूला त्यानं फटकेबाजी केली. त्याचवेळी लॉरेन्सनं मारलेला एक शॉट सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लॉरेन्सनं तीन सलग सिक्स मारल्यानंतर डर्बीशायरच्या बॉलरनं तो बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. त्या बॉलपर्यंत लॉरेन्स नीट पोहचला नाही. तो शॉट मारताना तोल गेल्यानं तो खाली पडला. पण तरीही त्याला फोर मिळाला. त्याचा हा विचित्र शॉट सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.
अरे ये लास्ट वाला शॉट क्या था भाई 😳 https://t.co/ulJZzyaUDW
— Daya sagar (@DayaSagar95) May 15, 2021
IPL 2021 नंतर टीम इंडियाच्या आणखी एका सीरिजला कोरोनाचा धोका, यजमान देशाची चिंता वाढली
डॅन लॉरेन्सच्या 152 रनच्या जोरावर एसेक्सनं त्यांची पहिली इनिंग 3 आऊट 412 वर घोषित केली. त्याला उत्तर देताना डर्बीशायरची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसअखेर त्यांची अवस्था 3 आऊट 35 अशी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, Video viral, Video Viral On Social Media