आग्रा, 16 ऑक्टोबर : आग्र्यात (Agra News) एका तरुणीवर स्वत:च्याच प्रियकराच्या हत्येचं (Boyfriend Murder) कारस्थान रचल्याचा आरोप आहे. तरुणीने भावाकडून आपल्या प्रियकराची हत्या करण्यास सांगितली होती, त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या दोन्ही भावांना अटक केली असून शुक्रवारी त्यांनी याचा खुलासा केला.
शुक्रवारी एसपी आरए पश्चिम सत्यजीत गुप्ता यांनी या प्रकरणाचा खुलासा करीत असताना सांगितलं की, 3 ऑक्टोबर रोजी बसई जगनेर येथील निवासी राहुल नावाचा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुलचा तपास सुरू केला. यादरम्यान 10 ऑक्टोबर रोजी गुंगाबाद मार्गाजवळील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला. मृत तरुणाच्या तक्रारीच्या आधारावर त्यांनी मुलाची प्रेयसीसह तिच्या दोन भावांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. (The bloody end of Love Story Rahul fell out of the house at night as his girlfriend called The next day the dead body was found in the well)
एसपी आरए यांनी सांगितलं की, तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला होता. त्यानंतर तपासाअंती तरुणी आणि तिच्या दोन्ही भावांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत आरोपींना घटनेची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे मृत तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. तिच्या कुटुंबीयांना याबाबत कळालं होतं.
हे ही वाचा-गाडीला कट मारल्याने वाद, मारहाणीत पुण्यातील दुचाकीस्वाराचा तडफडून मृत्यू
गावात बदनामी झाल्याचं कारण देत कुटुंबीय रागावले होते. यामुळे तिने राहुलला फोन करून रात्री भेटायला बोलावलं होतं. जसं राहुल घराजवळ आला तिच्या एका भावाने त्याच्या डोक्यावर वीट मारून त्याची हत्या केली. यानंतर दोघांनी मिळून राहुलचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. तर दुसऱ्या भावाने दोन्ही आरोपींना लपवलं. येथून दोघे पळून जाण्याच्या तयारीत होते, तोच पोलिसांनी त्यांना अटक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agra, Boyfriend, Girlfriend, Murder