मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

थायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलीस तपासतायंत 50 कॉल रेकॉर्ड; नेतमंडळीही अडकणार?

थायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलीस तपासतायंत 50 कॉल रेकॉर्ड; नेतमंडळीही अडकणार?

थायलंडवरून कॉलगर्ल (Thailand Call Girl Death Case)बोलण्यात आल्याचं आणि इथेच तिचा मृत्यू झाल्याचं प्रकरण गेले काही दिवस लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणात गाजतं आहे. दरम्यान या प्रकरणी काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 मे: थायलंडवरून कॉलगर्ल (Thailand Call Girl Death Case) बोलवण्यात आल्याचं आणि इथेच तिचा मृत्यू झाल्याचं प्रकरण गेले काही दिवस लखनऊमध्ये (Lucknow) मोठ्या प्रमाणात गाजतं आहे. दरम्यान या प्रकरणी काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकणी काही बड्या नेत्यांवर आरोप केले जात असून पोलीस आतापर्यत 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी करत आहेत. याप्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार संजय सेठ (Sanjay Seth) यांच्या मुलावर देखील आरोप केले जात आहेत. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी ती कॉलगर्ल सेठ यांच्या मुलाने बोलावली असल्याचा आरोप केला आहे. केवळ भाजप नेता म्हणूनच नाही तर बांधकाम क्षेत्रातही संजय सेठ एक मोठं नाव आहे. त्यामुळे आयपी सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर तणावाचं वातावरण आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार ही कॉल गर्ल गेले तीन वर्षापासून लखनऊमध्ये येत होती असून ती शहरातील मोठ्या स्पा सेंटरमध्ये काम करायची. अनेक बडे नेते आणि व्यावसायिका तिच्या स्पा सेंटरमध्ये मसाजसाठी येत असत. या प्रकरणी आणखी काही हायप्रोफाइल नावं समोर येण्याची शक्यता आहे. 3 मे रोजी या महिलेची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला होता, त्यामुळे प्रकरण आणखी चिघळलं.

थायलंडवरून आलेल्या या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर सोशल मीडियावर संजय सेठ आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप करण्यात आले. यानंतर संजय सेठ यांनी पोलीस कनिशनरांना पत्र लिहीत याप्रकरणाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांची प्रतीमा मलिन करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हे वाचा-मदतीसाठी मन मोठं असावं लागतं; सर्वसामान्य आचारी 250 कोविड रुग्णांना पाठवतोय जेवण

DCP पूर्वी संजीव सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला 2019 मध्ये कामानिमित्त थायलंडहून लखनऊमध्ये पोहोचली होती. याठिकाणी सलमान नावाच्या एका व्यक्तीच्या ती संपर्कात आली आणि तिने राकेश शर्मा या छत्तीसगडमधील व्यक्तीच्या Thai O2 या स्पा सेंटरमध्ये काम मिळवलं. सलमान त्या स्पा सेंटरचा मॅनेजर होता. हे स्पा सेंटर गोमतीनगरमध्ये सिनेपोलीस मॉलच्या जवळ होतं. ती महिला एका हॉटेलमध्ये राहत असे. 8 एप्रिलपासून हे स्पा सेंटर बंद आहे, 23 एप्रिल रोजी तिची तब्येत बिघडली आणि 8 मे रोजी तिचा मृत्यू झाला. या दरम्यान तिला उपचारासाठी लोहिया रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

हे वाचा-असामान्य! छोट्या मुलीचा ज्या अँम्ब्युलन्समध्ये वडिलांच्या मांडीवर गेला जीव पण...

मिळालेल्या माहितीनुसार सलमाननेच तिला रुग्णालयात भरती केलं होतं. ती 31 मार्च रोजीच लखनऊमध्ये परतली होती. डीसीपींच्या माहितीनुसार अद्याप संजय सेठ त्यांच्या मुलाचं किंवा त्यांच्या नातेवाईकांचं कोणतंही कनेक्शन अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी 50 हून अधिक मोबाइल क्रमाकांचे डिटेल्स मागवले आहेत. काही सोशल मीडिया अकाउंट्सही तपासले जात आहेत.

याप्रकरणी पोलीस विविध अँगलने तपास करत आहेत. बड्या नेत्यांची आणि व्यावसायिकांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याने अधिक बारकाईने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Thailand