नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, सीताराम बाजार येथील संदीप शर्मा यांनी कोरोना रुग्णांची (Corona patient)मदत करण्यासाठी एक पाऊल उचललं. याबाबत परवीन स्वामी यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक पत्र शेअर केलं असून त्यात कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, सीताराम बाजार येथील एक छोटासा हलवाई संदीप शर्मा यांचे हे पत्र आहे. हे शर्मा उत्तर दिल्लीतील एका रुग्णालयातील 250 कोरोना रुग्णांना जेवण पाठवतात. तुम्हाला त्यांना काही मदत करता आली तर नक्की करा. कारण ते काही श्रीमंत नाहीत, पण आपल्यापरीनं जे जमेल ते करीत आहेत. या पत्रात काही वस्तुंची यादी आहे आणि शेवटी एक ओळ लिहीली आहे. बाकी श्रीमती तुम्ही बघून घ्या,तुम्ही जे पैसे द्याल त्यात मी तुमची सेवा करेन. हे ही वाचा-भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच? WHO नेसुद्धा व्यक्त केली चिंता त्यानंतर व्टिटरवरील (Twitter) काही लोकांनी संदीप यांना मदतीचा हात देण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी एक दिवसाचे पैसे देण्याचं मान्य केलं. एका युझरने संदीप यांना ते करीत असलेल्या कामासाठी सलाम केला आहे. तुम्ही जी मदत करीत आहात,ईश्वर तुम्हाला त्याच्या दुप्पट मदत करेल, असे एका युझरने म्हटले आहे. एका युझरने संदीप यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना सलाम केला आहे. कोरोनामुळे सगळ्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वच घटकांना मदतीची गरज आहे. अनेक लोक त्यांना शक्य आहे, त्या पध्दतीने गरजूंना,रुग्णांना मदत करीत आहेत. त्यातही ज्या कुटुंबांना किंवा लोकांना गरज आहे,त्यांना दोन वेळचं अन्न देणं यापेक्षा अधिक मोठं आणि दिलासादायककामदुसरं काही नाही,हेच संदीप यांच्या मदतीतून स्पष्ट होतं.Letter from Sandeep Sharma, a small halwai in Delhi’s Sitaram Bazaar who is catering food for 250 poor Covid patients at a North Delhi hospital: “Pay whatever you can; I will keep serving you irrespective”. He’s not a rich guy; he’s doing what he can. pic.twitter.com/b42XD1nYl8
— Praveen Swami (@praveenswami) May 7, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Delhi, Positive story