Home /News /crime /

माजी आमदाराच्या मुलानं गर्लफ्रेंडच्या नादात केली गर्भवती पत्नीची हत्या, भासवला अपघात

माजी आमदाराच्या मुलानं गर्लफ्रेंडच्या नादात केली गर्भवती पत्नीची हत्या, भासवला अपघात

धक्कादायक घटना! सात महिन्याच्या गरोदर पत्नीला गाडीत बसवलं, आधी हत्या केली मग गाडी फेकली दरीत.

    अरुणाचल प्रदेश, 26 नोव्हेंबर : टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या क्राइमसंबंधी मालिकांमध्ये बऱ्याच वेळा दाखवण्यात आलेल्या घटना खऱ्या आयुष्यातही घडतात. तशीच काहीशी घटना अरुणाचल प्रदेशात घडली आहे. अरुणाचलच्या एका माजी आमदाराच्या मुलानं आपल्या गर्लफ्रेंडच्या नादात त्याच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीचा खून केला आणि तो अपघात असल्याचं भासवलं. तेची मीना लिशी असं मृत गरोदर महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या संदर्भात आमदाराचा मुलगा तसंच एक महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे. मीनाच्या नवऱ्यानेच तिच्या खूनाची 10 लाखांची सुपारी दिली होती आणि खुनाला अपघात भासवण्यासाठी इनोव्हा कारचा अपघात घडवला होता. सात महिन्यांची गरोदर असलेल्या मीनाच्या हत्येप्रकरणी इटानगर पोलिसांनी तिचा पती माजी आमदाराचा मुलगा रॉनी लिशी याच्यासोबत चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अरुणाचल हादरला असून, जनतेतून संताप व्यक्त होत आहे. रॉनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. त्यासाठी कँडल मार्च काढले गेले आणि शांततेतच मोर्चाही काढण्यात आला. वाचा-बॉससोबत जुळले प्रेमसंबंध, बायकोनं केली FIR तर रशियन गर्लफ्रेंड पोहोचली कोर्टात जनसामान्यांचा वाढता दबाव लक्षात घेऊन पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. इटानगर राजधानी क्षेत्राचे पोलीस अधिक्षक जिमी चिराम म्हणाले, या हत्याकांडाच्या कटात विजय बिस्वास आणि चुमी ताया हे सामील होते त्यांना अटक करून त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. चुमी ताया ही रॉनीची गर्लफ्रेंड आहे. वाचा-पोलिसाकडे केली 5 लाखांच्या खंडणीची मागणी, नकार दिल्यानंतर भररस्त्यात घातली गोळी असं घडलं हत्याकांड मीनाच्या हत्येप्रकरणी एनएससीएन संघटनेशी संबंधित कपवांग लेटी, तन्नी खोयांग आणि दमित्रित खोयांग यांना अटक केली आहे. मीनाचा ड्रायव्हर दथंग सुयांग याची चौकशी केल्यानंतर या हत्याकांडाचं प्रकरण उघड झालं. त्यानी सांगितलं की रॉनीने मीनाच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी द्यायला तो तयार होता. त्यानी कपवांग लेटीशी संपर्क केला. कपवांगने कॉन्ट्रॅक्ट किलर शोधला. वाचा-धक्कादायक! बलात्कार करु शकले नाहीत म्हणून, मुलीला गच्चीवरुन खाली फेकलं या हत्येसाठी त्याला 5 लाख रुपये अडव्हान्स दिला होता. जमिनीच्या मिळणाऱ्या नुकसान भरपाईसंबंधी बोलणी करायला रॉनीने आपल्या गरोदर पत्नी मीनाला 5 नोव्हेंबरला कारसिंगाला पाठवलं. इनोव्हा कार कारसिंगा रस्त्यावरून जात असताना ड्रायव्हर दथंगनी बांज तेनाली या ठिकाणावरून दमित्री खियांगला गाडीत बसवलं. कचरा डेपोच्या पुढे गाडी गेल्यागेल्या दमित्रीने मीनाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. दमित्री ब्लॉक बिंदु या ठिकाणी कारमधून उतरला आणि दथंगनी कार थोडी पुढे नेऊन डावीकडच्या दरीच्या दिशेने कार सोडून दिली जेणेकरून हा अपघात झाला असं वाटेल. कार दरीत कोसळून मीनाचा मृत्यु झाला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी सत्य शोधून काढलं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Crime, Crime news

    पुढील बातम्या