जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतात आली अन् बॉससोबत जुळले प्रेमसंबंध, बायकोनं केली तक्रार तर रशियन गर्लफ्रेंड पोहोचली कोर्टात

भारतात आली अन् बॉससोबत जुळले प्रेमसंबंध, बायकोनं केली तक्रार तर रशियन गर्लफ्रेंड पोहोचली कोर्टात

Demo Pic

Demo Pic

मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीनं दाखल केलेल्या FIR विरोधात आता रशियन महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    वडोदरा, 26 नोव्हेंबर : मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियान महिलेचे मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीविरोधात आता गुजरातच्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियन महिलेचे आणि मालकाचे अनैतिक संबंध होते आणि त्यातून जे घडलं त्याविरोधात मसाज पार्लर मालकाच्या पत्नीनं मालक आणि रशियन महिलेविरोधात कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. नेमकं काय आहे प्रकरण? 2014 रोजी रशियन महिला भारतात आली. गुजरातच्या एका मसाज पार्लरमध्ये ही महिला काम करायला लागली. तिथे तिचे मसाज पार्लरच्या मालकासोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यातून ही महिला गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला असून ते बाळ या मालकाचं असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीनं कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. रशियन महिलेनं माझ्या पतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले असून तलाक घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. या व्यतिरिक्त दोघांनीही मला बेदम मारहाण देखील केली असल्याचं पार्लर मालकाच्या पत्नीनं एफआयआरमध्ये नमूद केलं आहे. रशियन महिलेला भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीनं दाखल केलेल्या FIR विरोधात आता रशियन महिलेनं गुजरातच्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून मसाज पार्लरच्या मालकानं देखील अटकेपासून सुटका मिळावी यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयानं 15 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली असून पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून मसाज पार्लरच्या पत्नीला न्याय मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात