गोपाळगंज, 26 नोव्हेंबर : बिहार राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. बिहारच्या गोपाळगंजमध्ये मॉर्निंक वॉकला गेलेल्या होमगार्ड कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या होमगार्ड कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. ही घटना नगर पोलिस ठाण्यातील एकदेरवा गावची आहे. घटनेचे कारण घराच्या बांधकामादरम्यान होमगार्ड कॉन्स्टेबलनं पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जात आहे.
जखमी झालेल्या 55 वर्षीय होमगार्ड कॉन्स्टेबलचे नाव भोला सिंग असून तो नगर पोलीस स्टेशनच्या एकदेरवा गावचा आहे. जखमी जवाननं गुरुवारी सांगितले की, तो घराबाहेर फिरत होता. त्याचवेळी गावाजवळच्या एक पुलावर त्याला काही लोकांनी रोखले त्यानंतर गोळीबार सुरू केला.
वाचा-धक्कादायक! बलात्कार करु शकले नाहीत म्हणून, मुलीला गच्चीवरुन खाली फेकलं
गुन्हेगारांनी तीनवेळा गोळीबार केला, मात्र होमगार्डच्या पायाला एकच गोळी होती. त्यानंतर गोळीबार करणारे गुन्हेगार तेथून पळून गेले. होमगार्डच्या घरातील सदस्यांनी त्यांना गंभीर अवस्थेत सदर रुग्णालयात दाखल केले. कुख्यात संजय सिंग आणि राजकिशोर सिंग यांनी त्याच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा आरोप पीडित जवानांनी केला आहे. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही. या कारणास्तव, गुरुवारी पहाटे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
वाचा-भिवंडीत तणाव! मोबाईलचं आमिष दाखवून नराधमानं अल्पवयीन मुलीच्या अब्रुचे तोडले लचके
पीडित जवानाचा चुलत भाऊ आणि वकील ध्रुव कुमार सिंह म्हणाले की, दोन्ही आरोपी यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये तुरूंगात गेले आहेत. शहर पोलीस ठाण्यात खंडणी व हत्येचा गुन्हा दाखल आहे. सदर रुग्णालयात ड्यूटीवर असलेले डॉ. मुकेश कुमार यांनी सांगितले की, जखमी जवानला मांडीवर गोळी लागली. मात्र, आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news