मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शिक्षक झाला नराधम, नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार

शिक्षक झाला नराधम, नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार

 जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

रायगड, 06 जानेवारी : रायगड (Raigad) जिल्ह्यातील  माणगाव तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणगाव तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालावेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शरिरिक अत्याचार करीत होता.

मुंबई सेंट्रलचं नाव बदलणार, आता 'नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस'

अखेर या नराधम शिक्षकाच्या अत्याचाराला न घाबरता या मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये मदन वानखेडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

स्वप्नील शिंदेची झाली 'साईशा'; प्रसिद्ध डिझायनरचा 'ट्रान्सवूमन' होण्याचा निर्णय

या तक्रारीनंतर  शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. त्याच्याविरोधात  पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

First published:

Tags: Raigad, Rape, Techer