मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /स्वप्नील शिंदेची झाली 'साईशा'; प्रसिद्ध डिझायनरने घेतला 'ट्रान्सवूमन' होण्याचा निर्णय

स्वप्नील शिंदेची झाली 'साईशा'; प्रसिद्ध डिझायनरने घेतला 'ट्रान्सवूमन' होण्याचा निर्णय

बॉलिवूड डिझायरनर स्वप्नील शिंदेने (Swapnil Shinde) ट्रान्सवूमन होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्वागत केलं आहे.

बॉलिवूड डिझायरनर स्वप्नील शिंदेने (Swapnil Shinde) ट्रान्सवूमन होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्वागत केलं आहे.

बॉलिवूड डिझायरनर स्वप्नील शिंदेने (Swapnil Shinde) ट्रान्सवूमन होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्वागत केलं आहे.

मुंबई, 06 जानेवारी: बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदेमध्ये (Swapnil Shinde) झालेल्या एका बदलामुळे सध्या आश्यर्यचकीत झालं आहे. तो बदल आहे. ट्रान्सवूमन होण्याचा. डिझायनर स्वप्नील शिंदेनी स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नीलने त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले फोटो आणि एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नीलने आता स्वत:चं नाव बदलून साईशा ठेवलं आहे.

स्वप्नीलला साईशाच्या रुपात पाहणंही बॉलिवूडकरांना अतिशय आवडलं आहे. साईशा आता तेवढीच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. साईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये मला विचित्र वागणूक दिली जायची कारण मी वेगळा होतो.' या कारणामुळे स्वप्नीलने स्वत:ची सर्जरी करुन घेतली आहे.

साईशाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहीलं आहे की, 'कॉलेजच्या काळात असताना मला असं वाटायचं की, मी गे (Gay) आहे म्हणून मला पुरूषांचं आकर्षण वाटत आहे. माझ्या मनाची काहीतरी समजूत काढायचो. पण शेवटी माझ्या आयुष्यातलं एक महत्वाचं सत्य मला स्वीकारावंच लागलं की मी एक ट्रान्सवूमन आहे.'

स्वप्नीलमधील या बदलाचं सनी लिओनी, अदिती राव हैदरी, श्रृती हसन, सई ताम्हणकर यांनी स्वागत केलं आहे. स्वप्नील अर्थात साईशाच्या पोस्टवर त्यांनी कॉमेंट करुन तिला पाठिंबा दर्शवला आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News