मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घटस्फोटीत शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या; 6 वर्षांची चिमुरडी आईसाठी करतेय आक्रोश

घटस्फोटीत शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या; 6 वर्षांची चिमुरडी आईसाठी करतेय आक्रोश

Mohammad news

Mohammad news

वयाच्या सहाव्या वर्षी आईचं छत्र हरपलेली ती चिमुरडी मृतदेहाशेजारी बसून आईला उठवण्याचा प्रयत्न करीत आहे.

मुरादाबाद, 7 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) येथे शनिवारी एका 30 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचा 5 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तिचं आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मृत महिलेला 6 वर्षांची मुलगीदेखील आहे. तिच्यावर  दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ती वारंवार आईला विचारत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (Divorced teacher commits suicide by strangulation) ही घटना मुरादाबाद येथील आकाश ग्रीन सोसायटी येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सोसायटीत राहाणाऱ्या शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला आपल्या कुटुंबापासून वेगळी राहत होती. सीओ अनिल कुमार यांनी सांगितलं की, शिक्षिका सूची भारद्वाज आपली मुलगी पीहूसोबत काही महिन्यांपासून आकाश ग्रीन सोसायटीत भाड्याचं घर घेऊन राहत होती. मुरादाबाद येथील अनेक शाळांमध्ये तिने शिक्षिकेचं काम केलं आहे.

हे ही वाचा-मंदिर उभारणीसाठी या भाविकाकडून तब्बल 20 कोटींचं दान

सीओ अनिल कुमार यांनी पुढे सांगितलं की, मृत महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीला आईच्या घरी सोडलं होतं. तेव्हा तिने कुटुंबीयांना सांगितलं होतं की, सकाळी गजरौला येथील एका शाळेत तिला मुलाखत देण्यासाठी जायचं आहे. मात्र जेव्हा कुटुंबीयांनी तिला कॉल केला तेव्हा तिने फोन उचललाच नाही. ज्यानंतर कुटुंबीय चिंतेत होते. त्यामुळे मृत महिलेचा भाऊ तिला पाहण्यासाठी घरी पोहोचला तर घर आतून लॉक होतं. भावाने मागच्या दाराचे पाहिलं तर सूची गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसली. हे पाहताच भावाच्या पायाखालची जमीन सरकली. (Divorced teacher commits suicide) त्याने कुटुंबीयांची याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्याबाबत सांगितलं तर कुटुंबाने नकार दिला. सध्या पोलीस सूचीच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहे. शेजारील महिलांनीही सूची अत्यंच चांगल्या स्वभावाची असल्याचं सांगितलं.

First published:

Tags: Suicide news, Up crime news, Uttar pardesh, Yogi government