जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पत्नी रोज रात्री उशिरा यायची, पत्नीने चाकूने 10 वार करून संपवलं, मुंबईतील घटना

पत्नी रोज रात्री उशिरा यायची, पत्नीने चाकूने 10 वार करून संपवलं, मुंबईतील घटना

पत्नी रोज रात्री उशिरा यायची, पत्नीने चाकूने 10 वार करून संपवलं, मुंबईतील घटना

नेहमीप्रमाणे पूनम रात्री उशिरा घरी आली याच मुद्द्यावरून पुन्हा महेश आणि पूनम यांच्यात वाद झाला

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मे: मुंबईतील (Mumbai) मालाड पूर्व भागात आपल्या पत्नीची हत्या (Wife Murder) करून एक व्यक्ती पळून चालला होता, कुरार पोलिसांनी (kurar police station) पाठलाग करून त्याला अटक केली.अवघ्या दोन तासांत पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघडकीस आणला असून या घटनेमुळे मालाड (Malad) परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व येथील कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत क्रांतीनगर भागांमध्ये महेश सोनी आणि त्याची पत्नी पूनम हे दोघे राहत होते. गेले अनेक दिवस पुनम रात्री उशिरा घरी यायची. याबाबत पूनमला अनेक वेळा जाब विचारला.  शेवटी महेशने तपास केला तेव्हा पूनमचे शेजारील एका तरुणाची संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. यावरून महेशने पूनमला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून वारंवार महेश आणि पूनम या दोघांमध्ये भांडणे देखील व्हायची पण तरीही पूनमचे रात्री उशिरा घरी येणं सुरूच होतं. मराठी कलाकारांनी कोरोनाला कसं हरवलं?; अनुभवाद्वारे केलं चाहत्यांना सावध शेवटी महेश सोनियाने गावावरून विकत आणलेला रामपुरी चाकू त्याने पूनमच्या हत्या करता वापरला. नेहमीप्रमाणे पूनम रात्री उशिरा घरी आली याच मुद्द्यावरून पुन्हा महेश आणि पूनम यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, महेशने पूनमवर चाकूने सपासप वार केले. पूनमच्या गळ्यावर छातीवर आणि पोटावर दहा वार करून निर्दयपणे हत्या केली. पूनमची हत्या झाल्याची माहिती कळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आणि काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याच दरम्यान पूनमचा पती महेश पळून जाण्याच्या तयारीत होता आणि तेव्हाच कुरार पोलिसांनी महेशला अटक केली. पूनमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे तर महेश सोनी याला पोलिसांनी अटक करून त्याला आता कोर्टात सादर करणार आहेत. TMC चा बॅट्समन, BJP चा बॉलर, पश्चिम बंगाल विधानसभेत दोन क्रिकेटपटू भिडणार ज्यावेळेस महेशने पूनमची हत्या केली,  तेव्हा रूममध्ये फक्त महेश आणि त्याची पत्नी पुन्हा दोघेच होते. या हत्येची कुणकुण शेजाऱ्यांना लागली आणि शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर महेशने घरातील जे सामान मिळले ते सामान गोळा करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महेशचा मुलगा शिवा सोनी हा दरवाजाजवळ आला. त्यावेळेस महेशने त्याचा मुलगा शिवा सोनी याला आत मध्ये घेतले आणि दरवाजा उघडून पळू लागला. पण कुरार पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांनी महेशला घटनास्थळावरून अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात