मराठी कलाकारांनी कोरोनाला कसं हरवलं?; अनुभवाद्वारे केलं चाहत्यांना सावध

मराठी कलाकारांनी कोरोनाला कसं हरवलं?; अनुभवाद्वारे केलं चाहत्यांना सावध

कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे हा अनुभव आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. जेणेकरुन कोरोनाची लागण झाल्यास त्यांना भीती वाटणार नाही. व योग्य उपाचार घेण्यास मदत होईल. तर मग पाहूया काय म्हणाले मराठी सेलिब्रिटी...

  • Share this:

मुंबई 3 मे: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान काही मराठी कलाकारांनी नुकतीच कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांनी सोशल मीडियाद्वारे हा अनुभव आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. जेणेकरुन कोरोनाची लागण झाल्यास त्यांना भीती वाटणार नाही. व योग्य उपाचार घेण्यास मदत होईल. तर मग पाहूया काय म्हणाले मराठी सेलिब्रिटी...

अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rituja Bagwe) या अभिनेत्रीला दोनदा कोरोनानं गाठलं होतं. परंतु तिनं दोन्ही वेळा त्यावर मात केली. तिनं क्वारंटाईनमध्ये असताना आवडते चित्रपट आणि पुस्तकं वाचली. त्यामुळं तिला कुठल्याही प्रकारचं नैराश्य जाणवलं नाही. तिच्या मते क्वारंटिनमध्ये असताना तुम्ही मानसिकरित्या तंदुरुस्त असणं जास्त गरजेचं असतं अन्यथा तुम्ही नैराश्येत जाऊ शकता. शिवाय तिनं आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रीणींसोबत फोनवर व्हिडीओ कॉलिंगवर गप्पा मारल्या त्यामुळं तिला एकटेपणा जाणवला नाही.

अभिनेत्री मिताली मयेकर (Mithali Mayekar) – मितालीला पहिले दोन दिवस प्रचंड स्त्रास जाणवला. कारण तिला एका खोलीत दिवसभर बंद राहणं तिला कठीण जात होतं. परंतु मग तिनं व्हिडीओ गेम्स पाहून, पुस्तकं वाचून, वेब सीरिज पाहून वेळ घालवण्यास सुरुवात केली. तिनं प्रामुख्यानं विनोदी पुस्तकं मोठ्या प्रमाणावर वाचली त्यामुळं तिचा वेळ उत्तम जायचा व तिचं मन प्रसन्न राहायचं.

‘...तर आम्ही नवी दयाबेन शोधू’; ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांचा दिशा वकानीला इशारा

अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) – स्वत:वर ताबा ठेवा. कारण कोरोनामध्ये एकटं पडल्यानंतर चिढचिढ होते. डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य काळजीपूर्वक पाळा. सकारात्मक विचार करा तरच औषधांचा तुमच्या शरीरावर योग्य परिणाम होतो.

अभिनेत्री अनुजा साठ्ये (Anuja Sathye) अनुजा म्हणाली घाबरु नका. कारण कोरोना झाला आहे हे ऐकताच लोक घाबरतात. तो एक सामान्य आजार आहे अन् योग्य उपचारानं बरं होता येतं हे आधी मनात पक्क बसवा. त्यानंतर डॉक्टरांच्या सुचनांचं योग्य प्रकारे पालन करा. चांगले चित्रपट पाहा, पुस्तकं वाचा, जे कुठले छंद तुम्हाला आहेत अन् जे घरबसल्या करता येतील त्या सर्वांचा मनसोक्त आनंद घ्या. यामुळं कोरोनामुळं तुम्ही नैराश्येत जाणार नाही. अन् आनंदी असलेला माणूस लवकर बरा होतो.

अशा प्रकारे या सर्व कलाकारांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. या सर्वांनी एक गोष्ट कॉमन सांगितली आहे अन् ती म्हणजे स्वत:चं मन सतत आवडत्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा जेणेकरुन तुमच्यावर ताण येणार नाही. तुमचा वेळ छान जाईल. अन् दुसरी म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा दाखवू नका.

Published by: Mandar Gurav
First published: May 3, 2021, 4:13 PM IST

ताज्या बातम्या