TMC चा बॅट्समन, BJP चा बॉलर, पश्चिम बंगाल विधानसभेत दोन क्रिकेटपटू भिडणार

TMC चा बॅट्समन, BJP चा बॉलर, पश्चिम बंगाल विधानसभेत दोन क्रिकेटपटू भिडणार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Elections 2021) दोन क्रिकेटपटूंचा विजय झाला आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोज तिवारी (Manoj Tiwary) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तिकीटावर तर अशोक डिंडा (Ashok Dinda) भाजपच्या (BJP) तिकीटावर विजयी झाले आहेत.

  • Share this:

कोलकाता, 3 मे: क्रिकेटपटूंमधली लढत आपण मैदानात नेहमीच बघतो, पण आता हीच लढत पश्चिम बंगाल विधानसभेतही पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Elections 2021) दोन क्रिकेटपटूंचा विजय झाला आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोज तिवारी (Manoj Tiwary) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तिकीटावर तर अशोक डिंडा (Ashok Dinda) भाजपच्या (BJP) तिकीटावर विजयी झाले आहेत. मनोज तिवारी आणि अशोक डिंडा यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी राजकारणात प्रवेश केला होता.

35 वर्षांचा मनोज तिवारी याने शिवपूर मतदारसंघातून विजय मिळवला, त्याने भाजप उमेदवार रतिन चक्रवर्ती यांचा 32 हजार 603 मतांनी पराभव केला. मागच्या वर्षी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये आपण प्रवासी मजुरांची अवस्था बघितली, यानंतर क्रिकेट सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मनोज तिवारीने दिली.

37 वर्षांच्या अशोक डिंडाने मोईना विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. डिंडाने तृणमूलचे संग्राम कुमार दोलाई यांचा 1,260 मतांनी पराभव केला. संग्राम कुमार यांनी मागची विधानसभा निवडणूक 12 हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती. अशोक डिंडाने भारताकडून 13 वनडे आणि 9 टी-20 मॅच खेळल्या, तर मनोज तिवारीने 13 वनडे आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं.

'मी या निवडणुकीसाठी चांगली तयारी केली, विजयासाठी मी कठोर परिश्रम घेतले. राजकारण सोपी गोष्ट नाही, हे मला माहिती आहे. वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हे आणखी कठीण आहे. शिवपूरमध्ये मी प्रत्येक घरी जाऊन प्रचार केला,' असं मनोज तिवारी म्हणाला.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 4:04 PM IST

ताज्या बातम्या