Home /News /crime /

ठाणे हादरलं, मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडण्याचा संशय

ठाणे हादरलं, मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडण्याचा संशय

ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Sheikh) असं त्यांचं नाव आहे. जमील शेख यांची अज्ञात हल्लेखोराने डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे.

ठाणे, 23 नोव्हेंबर : एकीकडे वीज बिलाच्या (electricity bill) मुद्यावर मनसेनं (MNS) आक्रमकपणे आंदोलन पुकारले आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये (Thane) मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.  या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Sheikh) असं त्यांचं नाव आहे. ठाण्यातील राबोडी परिसरात ही घटना घडली आहे. जमील शेख यांची अज्ञात हल्लेखोराने हत्या केली आहे. जमील शेख यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. जमील यांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हत्या का करण्यात आली असावी, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह  शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, पोलीस अजूनही हत्येला दुजोरा देत नसून, वैद्यकीय अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले आहे. जमील यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरता जे जे रुग्णालयाला नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. दुसरीकडे घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, जमीलच्या हत्येनंतर राबोडी भागात तणावाचे वातावरण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावर बसला पती मागील महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी अंबरनाथमध्ये मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती.  अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जैनम रेसिडेन्सी परिसरात पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.  हल्ल्याच्यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चहाच्या एका घोटानं घेतला जीव, वयस्कर पत्नीनं चहापावडर ऐवजी टाकलं विष याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या काही तासांतच सीडीआर लोकेशनच्या मदतीने मुरबाडमधून चार आरोपींना नाकाबंदी दरम्यान अटक केली होती. पण, मुख्य आरोपी डी मोहन आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. पण, 13 दिवसांच्या शोध कार्यानंतर मुख्य आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली होती.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या