Home /News /national /

धक्कादायक! चहाच्या एका घोटानं घेतला जीव, वयस्कर पत्नीनं चहापावडर ऐवजी टाकलं विष

धक्कादायक! चहाच्या एका घोटानं घेतला जीव, वयस्कर पत्नीनं चहापावडर ऐवजी टाकलं विष

हसतं खेळतं घर एक चहाच्या घोटानं झालं उद्धवस्त, वाचा नेमकं काय घडलं.

    इंदूर, 23 नोव्हेंबर : मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. हसत-खेळतं घर एका चहाच्या घोटानं उद्धवस्त झालं. अशोकनगर जिल्ह्यात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचा चहानं जीव घेतला. वयस्कर पत्नीला नीट दिसत नसल्यामुळे सकाळी चहा करताना त्यांनी चहा पावडर ऐवजी चहात किटकनाशक टाकलंय हा चहा प्यायल्यामुळे वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशातील श्रीकिशन सेन आणि कमलाबाई या वृद्ध जोडप्यासाठी सकाळचा चहा त्यांचा शेवटचा चहा असेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती. नेहमीप्रमाणे कमलाबाई आपल्या पतीसाठी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. तेव्हा त्यांना कळले की चहापावडर संपली आहे. त्यामुळे त्या दुसऱ्या खोलीत गेल्या, डोळ्यांना नीट दिसत नसल्यामुळे त्यांनी चहापावडर समजून कीटकनाशक औषध उचललं. वाचा-PHOTOS: 6 कोटी रुपयांच्या कोकीनसह विदेशी महिला प्रवाशाला अटक स्वयंपाकघरात आल्यानंतर त्यांनी उकळत्या पाण्यात कीटकनाशक ओतलं. त्यानंतर त्यांनी पतीला आणि मुलाला चहा दिला. त्यानंतर स्वत: चहा घेतला. चहा प्यायल्यानंतर श्रीकिशन सेन सायकलवरून बाहेर निघाले, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना चक्कर आली. तर मुलाला चहा कडू लागल्यानं त्यानं चहा टाकून दिला. श्रीकिशन यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसरीकडे घरात कमलाबाई आणि मुलगा जितेंद्र यांचीही प्रकृती बिघडू लागली. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी थोड्यावेळानं कमलाबाई यांनाही मृत घोषित केले, तर मुलगा जितेंद्रवर उपचार सुरू आहेत. वाचा-पतीने दुसरं लग्न केल्याने पत्नीचा जळफळाट; सवतीला पेट्रोल टाकून जाळणार इतक्यात... या प्रकरणाची माहिती मिळताच मुगावली पोलीस स्टेशनचे प्रभारी सोनपालसिंग तोमरही घटनास्थळी दाखल झाले. चहापावडर आणि किटकनाशक यांचा तपास केला जात आहे. मात्र, एका वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या