Home /News /crime /

'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावरच खुर्ची टाकून बसला पती

'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावरच खुर्ची टाकून बसला पती

त्या क्रूर व्यक्तीने पत्नीला जीवे मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर खुर्ची ठेवली व तो तिच्या अंगावर बसला.

    पानीपत, 23 नोव्हेंबर : हरियाणाच्या (Hariyana) पानिपत जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या जिल्ह्यातील रमेश कॉलनीमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या (wifes Murder) केली. हा व्यक्ती वारंवार दारू पिऊन घरात गोंधळ घालायचा. त्यादिवशीही पत्नी पतीला दारू पिऊ नका असं वारंवार सांगत होती. त्या रागात पतीने पत्नीला जीवे मारले. इतकचं नाही तर त्यापुढील घटना अधिक धक्कादायक आहे. त्या क्रूर व्यक्तीने पत्नीला जीवे मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर खुर्ची ठेवली व तो तिच्या अंगावर बसला. गोंधळाचा आवाज आल्यानंतर त्यांची मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिने वडिलांचं हे रुप पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱच्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सेक्टर-29 ठाणे प्रभारी राजबीर सिंह यांनी सांगितलं की, रमेश यांच्या जबाबानंतर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार सोनू हा पत्नीच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा. दारूची नशा केल्याबद्दल पत्नी पतीला रोखत होती. या कारणाने पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-'मी घाबरत नाही पण...सॉरी बाबा'; सुसाइड नोट लिहून ITI विद्यार्थ्याची आत्महत्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी जमा झाले मतलौडा क्षेत्रात सोनू वर्मा ट्रक ड्रायव्हरचं काम करीत होता. चार महिन्यांपासून तो रमेश कॉलनीत पत्नी संजना (26) आणि मुलगी (7), मुलगा (1) सोबत भाड्याने राहत होता. आरोपीच्या मुलीने सांगितलं की, आई नेहमी बाबांना नशा करण्यापासून रोखत होती. शनिवारी वडिलांनी आईला खूप मारहाण केली आणि रात्रभर झोपू दिलं नाही. ती झोपेतून जागी झाली तर तिलाही धमकावून भावासोबत खोलीत झोपायला सांगितलं. सकाळी आई स्वयंपाक करीत होती. वडिलांनी आईच्या मानेवर चाकूने वार केला. मुलीला आईचा आवाज आल्यानंतर ती खोलीतून बाहेर आली. मुलीच्या आवाजाने शेजारीही जमा झाले. ते खोलीत गेले तेव्हा सोनू पत्नीच्या मृतदेहावर खुर्ची टाकून बसला होता. महिलेच्या गळ्यातून रक्त येत होते. यावेळी सोनू लोकांना सांगत होता की तिच्या पत्नीचे अवैध संबंध होते. म्हणून तिला मारलं.  तो पुढे म्हणाल की, मी पळणार नाही आणि मी पोलिसांना घाबरत होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या