कोलकाता 14 जून : पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर (West Bengal Election 2021) झालेल्या हिंसाचाराबद्दल (Post-Poll Bengal Violence) अनेक महिलांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. या महिलांनी एसआयटी चौकशीची मागणी करून स्वत:वर झालेल्या अत्याचाराची माहितीही दिली आहे. एका 60 वर्षीय महिलेनं सांगितलं, की 4 मे रोजी रात्री टीएमसीचे कार्यकर्ते जबरदस्ती या महिलेच्या रात घुसले होते आणि तिच्या नातवासमोरच महिलेवर बलात्कार केला. हे प्रकरण बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील आहे. रिपोर्टनुसार, टीएमसीकडून बदला घेण्याच्या उद्देशानं बलात्कारासारखे गुन्हे घडवले जात आहेत.
झटका ! प्रणब मुखर्जी यांचे सुपूत्र Congress ला करणार रामराम?
इतकंच नाही तर या महिलेनं आपल्या अर्जात म्हटलं, की बंगालमध्ये या घटना घडत असताना पोलीस काहीही पाऊलं उचलत नसल्यानं या गोष्टींना आणखीच प्रोत्साहन मिळत आहे. याआधीही 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेबाबत पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठवली होती. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसेत दोन भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूच्या आरोपासंदर्भात ही याचिका होती. आता याचिका करणाऱ्या एका महिलेनं म्हटलं आहे, की तिच्या पतीनं भाजपचा प्रचार केला होता. याच कारणामुळे टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी कुऱ्हाडीनं त्यांची हत्या केली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू; अवयव दान करणार कुटुंबीय
महिलेनं म्हटलं, की तिनं स्वतःच्या डोळ्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात आपल्या पतीचा जीव जाताना पाहिला. इतकंच नाही तर हल्लेखोरांनी महिलेवरही बलात्काराचा प्रयत्न केला. याशिवाय न्यायालयात एका 17 वर्षीय दलित मुलीनं सांगितलं, की 9 मे रोजी टीएमसीच्या काही कार्यकर्त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर या पीडितेनं आरोप केला, की तिला अशी धमकी देण्यात आली होती, की याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्यात येईल. निवडणुकांनंतर होणाऱ्या या हिंसेबाबत सर्वोच्च न्यायालयानं बंगाल सरकारला नोटीसही पाठवली होती. याशिवाय 4 जूनला कोलकाता सर्वोच्च न्यायालयानंही बंगाल सरकार प्रशासनाला आदेश दिला आहे, की हिंसेनंतर घरं सोडून पळालेल्या लोकांना परत घरी आणण्यासाठी प्रयत्न करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Rape, West Bengal Election