मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेसला आणखी एक झटका बसण्याची शक्यता, प्रणब मुखर्जी यांचे सुपूत्र पक्षाला करणार रामराम?

काँग्रेसला आणखी एक झटका बसण्याची शक्यता, प्रणब मुखर्जी यांचे सुपूत्र पक्षाला करणार रामराम?

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव  (Pranab Mukherjee) मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee)काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

नवी दिल्ली, 14 जून: दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव (Pranab Mukherjee) मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee)काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. दरम्यान आता स्वतः अभिजीत मुखर्जी यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्र, टीव्हीवर अभिजीत मुखर्जी काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) सहभागी होणार आहेत.

माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांनी शुक्रवारी हे ट्वीट केलं होतं, त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही!

त्यानंतर हे ट्वीट त्यांनी डिलीट केलं. त्याच दिवशी मुखर्जी यांनी वृत्तसंस्था PTI सोबत बोलताना म्हटलं की, 'मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. मी टीएमसी किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत.

हेही वाचा- पैसों के लिए कुछ भी! तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की...

दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात अभिजीत यांनी टीएमसी नेत्यांची भेट घेतली होती. असं म्हटलं जात आहे की, टीएमसी अभिजीत यांनी जंगीपूर विधानसभा जागेवर उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यांचे वडील प्रणव मुखर्जी जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा कॉंग्रेस खासदार म्हणून विजयी झाले होते. 2012 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रणव मुखर्जी यांना ही जागा सोडावी लागली.

First published:
top videos

    Tags: Congress, Pranab mukherjee, TMC