Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

करवा चौथच्या दिवशी विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, नवऱ्यानेच हत्या केल्याचा आईचा आरोप

करवा चौथच्या दिवशी विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, नवऱ्यानेच हत्या केल्याचा आईचा आरोप

विवाहितेने चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याने तिचा जीव गेल्याची घटना नुकतीच समोर (Suicide of married woman in Akola jumped from fourth floor) आली आहे.

  • Published by:  desk news

अकोला, 26 ऑक्टोबर : विवाहितेने चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याने तिचा जीव गेल्याची घटना नुकतीच समोर (Suicide of married woman in Akola jumped from fourth floor) आली आहे. करवा चौथच्या दिवशी या महिलेनं चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आता ही आत्महत्या होती की हत्या, यावरून (Suicide or murder) आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महिलेने तिच्या मर्जीने उडी मारली, असं तिच्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे. तर तिच्या पती आणि दीरानं तिचा खून केल्याचा (Woman’s mother blames in laws) आरोप महिलेच्या आईनं केला आहे.

काय आहे प्रकरण?

अकोल्यात राहणाऱ्या सोनी शुक्ला नावाच्या महिलेनं राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. करवा चौथच्या दिवशीच ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं. पत्नीने आत्महत्या केल्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचं तिच्या पतीचं म्हणणं आहे, विवाहितेच्या आईनं जावयावर आणि मुलीच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला आहे.

पोलीस करतायत तपास

महिलेनं स्वतः चौथ्या मजल्यावरून उडी मारली की तिच्या पतीनं तिला ढकलून दिलं, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. या महिलेला आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं होतं का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

हे वाचा- MPSC परीक्षेत तोतयागिरी करणाऱ्या दोघांना अटक; 6 वर्षांपासून पोलिसांना गुंगार

अकोल्यात खळबळ

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामागे कौटुंबिक वादाचं कारण असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा हुंडाबळीचा प्रकार असू शकतो का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि दीर यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Murder, Police, Wife and husband