नेल्लूर 23 जुलै : एक संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. यात एका 14 वर्षीय मुलीवर तिच्याच सावत्र बापानं बलात्कार केला (Stepfather Rapes Minor for 6 Months) आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सतत सुरू होता. घटनेचा खुलासा झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) नेल्लूर येथे घडली आहे. धक्कादायक! जीन्स घालते म्हणून काकानं केला पुतणीचा खून, आजोबांनीही दिली साथ द टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या छोट्या भावानं या घटनेचा खुलासा केला आहे. 10 वर्षाच्या या मुलानं पाहिलं, की सावत्र बाप त्याच्या बहिणीसोबत चुकीचं कृत्य करत होता, हे पाहताच तो जोरानं ओरडला. मुलाचा आवाज ऐकताच शेजारी इथे पोहोचले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. आरोपीनं आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिला आहे. यानंतर त्यानं दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर आपल्या नव्या पत्नीच्या मुलीसोबतच घाणेरडं कृत्य केलं. पतीची लैंगिकता संपविण्यासाठी रचलं कारस्थान; रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह सुरुवातीला पीडितेची आई आरोपीविरोधात तक्रार करण्यास घाबरत होती कारण तिला आपल्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. मात्र, आता एका स्थानिक महिला असोसिएशननं दखल देत पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डीएसपी राजगोपाल रेड्डी यांनी पीडितेची विचारपूस केली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सध्या सुरू आहे. लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल. त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.